आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारणा पात्रात बुडून दोघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक रोड - शेवगे दारणा येथील दारणा पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या विकास गणपत बेरड (21) आणि विकास भिवाजी गायकर (19) या युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सागर गायकवाड याच्या प्रयत्नांमुळे विकास काळे या युवकाचा जीव वाचला.

भवानी मातेच्या यात्रेनिमित्त सुरेश पाळदे यांच्या कारणाच्या कार्यक्रमात जेवल्यानंतर उकडू लागल्याने दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून सागर गायकवाड, विकास काळे, विकास बेरड, विकास गायकर (रा. लहवीत) नदी पात्राकडे गेले. तिघांना पोहण्याची इच्छा झाली; मात्र सागर गायकवाडने घरी चालण्यास सांगितले. तरीही तिघांनी पात्रात उडी मारली. पोहता येत नसल्याने विकास पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच पोहण्यात तरबेज असलेल्या सागरने उडी मारून त्याला सुरक्षित बाहेर काढले. मात्र, बेरड व गायकर पाण्यात बुडाले. सागरने मदतीसाठी मित्र व यात्रेतील नातेवाइकांना फोन करून बोलवले. संसरी, शेवगे दारणा येथून आलेले विलास गिते, संजय गिते, सुसा टेलर व उमेश गोडसे यांनी पात्रात उड्या मारून घेतलेला शोध अपयशी ठरला.

नाशिक महापालिका, देवळाली कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी बोटीवरून गळ टाकून युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तासाभरानंतर बेरडला तर जवळपास तीन तासानंतर गायकरला शोधण्यात आले. नदीतील वाळू उपशामुळे पात्रात सुमारे 20 फुटांचा खड्डा पडून त्यातच हे युवक अडकल्याचा कयास केला जात आहे. बेरड देवळाली कॅम्पच्या एसव्हीकेटी कॉलेजमध्ये एफ. वाय. बी. कॉम.ला शिकत असून गायकरने दहावीची परीक्षा दिली आहे.