आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या दोन मुलींना निर्दयी मातेने सोडले रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ज्यांना आपली स्वत:ची ओळखही सांगता येणार नाही, अशा दोन पोटच्या गोळ्यांना एका निर्दयी मातेनं नाशकातील रामकुंड परिसरात बेवारसपणे सोडून देत पलायन केलं. आईसाठी हंबरडा फोडणार्‍या दोन्ही बालिकांना पाहून परिसरातील आयाबाया गोळा झाल्या.

त्यातीलच काहींनी त्यांना मायेनं जवळ घेत आसरा दिला अन् निर्ढावलेल्या या जगातही आपल्यासाठी कुणीतरी आहे, या उबेनं त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुललं.

रामकुंड परिसरात शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास एक साधारण 35 वर्षीय महिला दोन मुलींना घेऊन कपालेश्वर मंंिदरात आली. येथील ज्योतिषांचे कार्यालय कुठे आहे, असे तिने फूलविक्रेत्या महिलांना विचारले. त्यानुसार, ज्योतिषांकडे जाऊन आल्यानंतर त्या महिलेने एका बॅगसह दोन मुलींना तेथेच असणार्‍या भीक मागणार्‍या महिलेकडे सोपवून स्वच्छतागृहात जाऊन येते, असे सांगितले. मात्र, ती परत आलीच नाही.

दुपारी 12 वाजेपर्यंत येथील भिकारी महिलांनी आणि काही व्यावसायिकांनी त्या महिलेचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती सापडली नाही.

आपली आई कोठून येईल, याकडे नजरा लावून बसलेल्या या मुलींना पाहून उपस्थितांच्या काळजात चर्रर्र झाले. प्रत्येकाने या मुलींची आपुलकीने विचारपूस करत खाण्यापिण्याच्या चीजवस्तू आणून दिल्या. अनेकांनी त्यांची नावे व गावाविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र या सर्व प्रकारात भेदरलेल्या त्या निष्पाप जिवांना आपले नावही सांगता येऊ शकले नाही. काही फूलविक्रेत्यांनी सायंकाळी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही बहिणींना आधाराश्रमात दाखल केले. दोन्ही बहिणींपैकी एकीचे वय अवघ्या दीड वर्षाचे, तर दुसरी अडीच वर्षांची आहे.

सर्वत्र शोध घेतला
‘त्या’ महिलेने अंगात हिरव्या रंगाचा कुर्ता, सफेद रंगाचा सलवार आणि पिवळ्या रंगाची ओढणी परिधान केलेली होती. बॅगेत एक सिमकार्ड मिळाले. मोबाइलमध्ये टाकून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो क्रमांक बंद आढळून आला. दुपारपर्यंत सर्वानी शोध घेतला; मात्र काहीच उपयोग झाला नाही. सुरेश मानसिंगानी, व्यावसायिक

मिळालेल्या अन्नाने भागविली भूक
मुली भुकेलेल्या असल्याने त्यांना भीक मागून आणलेले अन्नच द्यावे लागले. असे करताना जिवात घालमेल झाली; मात्र त्यांची भूक बघवली नाही. चहाच्या टपरीवरून दूध आणून पाजले. आम्ही येथेच भीक मागून राहतो. दुपारीच भीक मागून रात्रीच्या जेवणाची सोय करावी लागते. मुलींची आई लवकर मिळो, हीच प्रार्थना!
शकूबाई, मुलींचा सांभाळ क रणारी महिला