आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या कृपेने दाेन महामार्ग पालिकेकडे; 35 दारू दुकाने झाेकात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मखमलाबादराेडवरील दारू दुकानबंदीसाठी महिलांनी कँडल मार्च काढला हाेता. - Divya Marathi
मखमलाबादराेडवरील दारू दुकानबंदीसाठी महिलांनी कँडल मार्च काढला हाेता.
नाशिक- राष्ट्रीयराज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंतचे मद्य दुकाने बंद करण्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद झालेल्या शहरातील १८९ मद्य दुकान, बारपैकी अाता ३५ दुकाने पुन्हा दिमाखात सुरू हाेणार अाहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, राज्य महामार्गाबाबत असलेला नाशिक दिंडाेरी डहाणू-त्र्यंबक-नाशिक या दाेन प्रमुख मार्गाला महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे अादेश राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी (दि. ३०) जारी केले. 

वरकरणी रस्ते केवळ पालिकेसारख्या प्राधिकरणाकडे देखभालीसाठी दिल्याचे दाखवले जात असले तरी, पालिकेच्या नावाखाली या मार्गावरील बंद दारू दुकाने सुरू करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून हालचाली सुरू हाेत्या. विशेष म्हणजे, भाजपचे काही नगरसेवक याविराेधात असतानाही भाजपच्याच पदाधिकाऱ्यांकडून रस्ते पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा हाेती. दारू दुकानाविराेधात प्रचंड राेषाचे वातावरण असताना त्यात खासकरून महिलांचा समावेश असताना राज्यातील भाजप सरकारनेच या रस्त्यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे दारू दुकाने सुरू करण्यासाठी दाखवलेली कृपा अाता उद्रेकाला निमंत्रण देणारी ठरेल, अशी भीती व्यक्त हाेत अाहे. 

काेर्टाच्या निर्णयानंतर एप्रिलपासून शहर जिल्ह्यातील ११४५ पैकी ग्रामीण भागात ७४४ तर शहरात १८९ मद्याची दुकाने बंद झाली. यात वाइन शाॅपपासून तर बिअर बार, परमिट रूम तर तारांकित हाॅटेल्सचाही समावेश हाेता. ही मद्याची दुकाने बंद झाल्याने नागरिकांनी खासकरून महिलांनी स्वागत केले हाेते. काही ठिकाणी स्थानिक अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने सुरू असलेली काही दुकाने बंद करण्यासाठी महिलांनी रणरागिनीचे रूप घेतले हाेते. 

काही ठिकाणी नियमात असलेली दुकानेही मद्यपींच्या त्रासामुळे बंद करण्यासाठी अांदाेलने झाली. खासकरून पंचवटी, सिडकाे, सातपूर या माेठ्या प्रमाणात उद्रेक हाेता. त्यामुळे प्रथम पालिकेने स्वत: शहरातील राष्ट्रीय राज्य महामार्ग अामच्याकडे हस्तांतरित करावे याबाबत ठराव करणे टाळले हाेते. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पालिकेने शहरातील महामार्गांची देखभाल करण्याची सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविण्यापुरतीच भूमिका मर्यादित ठेवल्याने प्रमुख मार्ग अवर्गीकृत करून पालिकेचा दर्जा देण्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर येऊन ठेपली. 

दरम्यान, भाजपतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून शासनस्तरावरून रस्ते अवर्गीकृत करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची चर्चा हाेती. अशात ३० मे राेजी प्रमुख मार्ग असलेल्या दिंडाेरी-नाशिक डहाणू-त्र्यंबक या राज्यमार्गांना पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय अाल्यामुळे अाता साधारण ३५ मद्याची दुकाने पुन्हा दिमाखात सुरू हाेणार अाहे. 

‘उत्पादनशुल्क’ची धावपळ सुरू
सार्वजनिकबांधकाम विभागाच्या परिपत्रक जारी झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धावपळ सुरू झाली. दिंडाेरीराेड त्र्यंबकराेडवर माेठ्या प्रमाणात मद्याची दुकानापासून तारांकित बार तथा परमिट रूम्स अाहेत. केवळ हे रस्तेच नाही तर परिसरातील ५०० मीटर अंतरापर्यंत बंद असलेली मद्य दुकाने सुरू हाेणार असल्याने या निर्णयाचा फायदा नेमका किती दुकानांना हाेणार याचा अभ्यास सुरू हाेता.

समांतर महामार्गाने काही दारू दुकाने बंद
दिंडाेरीराेडचाविचार केला तर काही ठिकाणी मुंबई-अाग्रा राष्ट्रीय महामार्ग तसेच दुसऱ्या बाजूला असलेला पेठराेड हा राज्य महामार्ग असल्यामुळे येथील दारू दुकाने सुरू हाेणार की नाही याबाबत अनिश्चितता अाहे. अशीच स्थिती गिरणारे-त्र्यंबकराेडची असून, त्यामुळेही काेणती दुकाने बंद हाेतील काेणती सुरू हाेणार याच अभ्यास सुरू झाला. त्यासाठी उत्पादन शुल्कचे अधीक्षक राजन अावळे अधिकाऱ्यांसह ठाण मांडून हाेते.

भाजपच्या नगरसेवकांनी यापूर्वीच दारू दुकाने बंदसाठी पाठपुरावा केला अाहे. त्याउपर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन संबंधित रस्त्यांना राज्यमार्गाचा दर्जा कायम ठेवावा, अशी मागणी करू. 
- शशिकांत जाधव, नगरसेवक, भाजप 
 
मद्याची दुकानेजगवण्याकरिता रस्ते हस्तांतरणाची बाब अत्यंत केविलवाणी अाहे. भाजपची हीच का साधनशुचिता असा प्रश्न असून सेना नक्कीच जाब विचारणार. 
- अजय बाेरस्ते, विराेधी पक्षनेता, महापालिका 

भाजप अामदारांसहमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रस्ते अवर्गीकृत करण्यामुळे दारू दुकाने सुरू हाेण्याची भीती त्यास लाेकांचा विराेध याबाबत वस्तुस्थिती कळवली जाईल. 
- अा. बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप 

या निर्णयामुळेकिती दारू दुकाने सुरू हाेतील किती बंद राहतील याचा अभ्यास सुरू अाहे. दिंडाेरीराेड त्र्यंबकराेडला लागून काही अन्य राष्ट्रीय राज्य महामार्ग असल्यामुळे बारकाईने किती दुकाने बंद राहतील किती सुरू करावी लागेल याचा अभ्यास करावा लागत अाहे. 
- राजन अावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 

पालिकेच्या रेकाॅर्डवर काय हाेते? 
१. डहाणू-जव्हार-त्र्यंबकहा राज्यमार्ग असून, यात मोडक सर्कल ते पिंपळगाव बहुला हा किमीचा मार्ग पालिकेकडे २२ एप्रिल १९८७ मध्ये हस्तांतरित झाला. विकास आराखड्यातही ६० मीटर रुंदीचा डी. पी. रस्ता अशी नोंद आहे. मात्र, हे मार्ग कायमस्वरूपी हस्तांतरित केले की केवळ देखभालीसाठी असा उल्लेख नसल्यामुळे पळवाटांसाठी संधी हाेती. 
२.नाशिक-दिंडोरीराज्यमार्गातील मेरी कॉर्नर ते म्हसरूळ बारी हा साडेपाच किमीचा रस्ता २८ जुलै १९९९ मध्येच हस्तांतरित केला आहे. पालिकेच्या विकास आराखड्यात ३० मीटर रुंद डी. पी. रस्ता म्हणून नोंद आहे. मात्र, या ठिकाणी रस्ता कायमस्वरूपी हस्तांतरित केला की देखभालीसाठी अथवा तात्पुरता याची नोंद नाही. 

मद्य दुकाने सुरू झाल्यास थेट न्यायालयात लढाई, पंचवटीकरांचा पवित्रा 
पंचवटी- अशोकस्तंभ व पंचवटीतील मखमलाबादरोडवरील मद्यविक्रीचे दुकाने सुरू होण्याची शक्यता असल्याने पंचवटी परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. मद्य दुकाने पुन्हा सुरू झाल्यास याविरोधात लढा सुरूच ठेवत न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेली दुकाने बंद करण्याचे आदेश आहे. मालेगाव स्टॅण्डवरील तीन दुकाने, मखमलाबादरोडवरील एक बिअर बार सुरूच होता. ही मद्य दुकाने बंद करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी अांदोलन उभारले होते. जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने पंचवटी परिसरातील दिंडोरी राज्यमार्गापासून मोजणी केली. या मोजणीस तीन ही दुकाने बाधित होत असल्याने ही दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिल्याने दुकान बंद झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान होते. नुकतेच महानगरपालिकेने निविदा काढून शहरातून जाणारे मार्ग हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने बंद झालेली दुकाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

मद्य दुकानेसुरू झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल. याविरोधात परिसरातील नागरिकांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल. 
- स्वप्नील येवले. नागरिक 

आंदोलन करूनमद्य दुकाने बंद झाली आहेत. पुन्हा दुकाने सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुकाने सुरू झाल्यास महिलांकडून तीव्र आंदोलन केले जाईल. 
- मंजूश्री लोखंडे, रहिवासी, मालेगाव स्टॅण्ड 

बंद झालेलीमद्य दुकाने पुन्हा सुरू झाल्यास याविरोधात तीव्र लढा सुरूच ठेवला जाईल. मनपाच्या विरोधात न्यायालयीन लढा उभारला जाईल. याबाबत मनपा प्रशासनाने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
- सागर बैरागी, मालेगाव स्टॅण्ड मित्रमंडळ 

निर्णय मागे घेतल्यास मंत्रालयासमोर आंदोलन, सातपूरकरांनी व्यक्त केला निर्धार  
सातपूर- राज्यमार्ग महानगरपालिका प्रशासन डी नोटिफिकेशन करणार असल्याने या निर्णयाने मद्य दुकाने सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. या निर्णयाच्या विरोधात सातपूर परिसरातील नागरिक आता थेट मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा प्रशासनाने हा निर्णय मागे घेतल्यास नागरिक आणि प्रशासनातील वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. 

पुढील स्लाइडवर पाहा, एप्रिल २०१७ नंतर बंद झालेली दारू दुकाने अशी... 
बातम्या आणखी आहेत...