आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन घरफोड्यांत तीन लाखांचा ऐवज चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातदोन ठिकाणी भरदिवसा झालेल्या घरफोडीत सुमारे तीन लाखांचा एेवज चोरी करण्यात आला. बुधवारी (दि. ८) रविवार कारंजा आणि बजरंगवाडी येथे हे दोन प्रकार घडले. या प्रकरणी सरकारवाडा, मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि वैभव नवले (रा. खरे सदन, रविवार कारंजा) यांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी बहिणीला भेटण्यास गेले होते. तसेत आई-वडील शेतीवर गेले होते. या दरम्यान, चोरट्यांनी घराचा कडीकलूप तोडून घरातील लाख ७५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. तसेच शेख खाजा शेख (रा. बजरंगवाडी) यांच्या घराचे कडीकोयंडा तोडून घरातील सुमारे ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी केले. 
बातम्या आणखी आहेत...