आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम.फार्मसी ‘सीईटी’साठी दोनशे विद्यार्थ्यांचे अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०१५ २०१६ या मास्टर ऑफ फार्मसी या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या १७ मे रोजी "एमएएच-एमपीएच-सीईटी' ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. बी. फार्मसी उत्तीर्ण तसेच शेवटच्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असून, आतापर्यंत २००हून अधिक विद्यार्थ्यांनी एआरसी केंद्रावरून ऑनलाइन अर्ज केले आहेत.

एम. फार्मसी अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. नाशिकमध्ये एम. फार्मसी अभ्यासक्रम असलेली १५ महाविद्यालये असून, त्यात एकूण ४५० जागा आहेत. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी हे अर्ज स्वीकृती केंद्र (एआरसी सेंटर) म्हणून नियुक्त करण्यात आले असून, १७० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. तर, जी पँट झालेल्या ३६ विद्यार्थ्यांनीही नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना ११ मेपर्यंत अर्ज करता येणार असून, त्यासाठी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
मविप्र कॉलेज ऑफ फार्मसी अर्ज स्वीकृती केंद्र
नाशिकिजल्ह्यामध्ये एम. फार्मसी अभ्यासक्रम असलेली एकूण १५ महाविद्यालये असून, त्यात एकूण ४५० जागा आहेत. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी हे अर्ज स्वीकृती केंद्र (एआरसी सेंटर) म्हणून नियुक्त करण्यात आले असून विद्यार्थ्यांना याठिकाणी एम. फार्मसीच्या सीईटीसाठी अर्ज करता येणार आहेत. '
३६ विद्यार्थ्यांना थेट प्रवेश
एआयसीटीईतर्फेघेण्यात आलेल्या ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूट टेस्ट (जीपॅट) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३६ विद्यार्थ्यांनी एम. फार्मसीसाठी नोंदणी केली असून, त्यांना थेट प्रवेश मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना एम.फार्मसी या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना एआयसीटीईकडून प्रतिमहिना १२ हजार ४०० रुपये विद्यावेतन मिळेल.
बातम्या आणखी आहेत...