आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव शहरातून दाेन काश्मिरी तरुण बेपत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - शहरातचंदा मागण्यासाठी अालेल्या पाच काश्मिरी तरुणांपैकी दाेघे जण ३० जूनपासून अचानक बेपत्ता अाहेत. एेन रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर हे तरुण बेपत्ता झाल्याने केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसह स्थानिक पाेलिस प्रशासन सतर्क झाले अाहे. या तरुणांच्या शाेधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात अाली अाहेत.

पुंछ जिल्ह्यात राहणारे अल्ताफ अहमद, मुख्तार अहमद मीर माेहंमद, मुश्ताक अहमद, इफ्तेकार हुसेन मीर माेहंमद इस्तियाक अहमद मुन्वर हुसेन हे पाच तरुण २९ जूनला मालेगावी अाले हाेते. २० ते २५ वयाेगटातील हे पाचही तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून, त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी शहरात फिरून चंदा जमा करत हाेते. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधव या महिन्यात सढळ हाताने दानधर्म करत असतात. मालेगाव शहरात चांगला चंदा मिळेल, या उद्देशाने हे तरुण मालेगावी दाखल झाले हाेते. दिवसभर चंदा जमा करून सायंकाळी नुरानी मशिदीजवळ एकत्र येण्याचे या तरुणांनी ठरविले हाेते. परंतु, इफ्तेकार हुसेन मीर माेहंमद इस्तियाक अहमद मुन्वर हुसेन हे दाेघे ३० जून राेजी बेपत्ता झाले अाहेत. दाेन दिवस त्यांचा शाेध घेऊनही ते सापडल्याने मुख्तार अहमद याने गुरुवारी अाझादनगर पाेलिस ठाण्यात दाेघे बेपत्ता झाल्याची माहिती दिली अाहे.


तरुण बेपत्ता झाल्याची माहिती केंद्रीय तसेच राज्य गुप्तचर यंत्रणेला दिली आहे. दहशतवादविराेधी पथक, स्थनिक गुन्हे शाखा जिल्हा विशेष शाखेलाही संदेश पाठविला अाहे. शहरासह अन्य ठिकाणी तरुणांचा शाेध सुरू अाहे. -मसूद खान, पाेलिस निरीक्षक

बंदाेबस्तात वाढ
२९सप्टेंबर २००८ मध्ये रमजान महिन्यात भिक्खू चाैकात बाॅम्बस्फाेट झाला हाेता. या बाॅम्बस्फाेटात सहा जण ठार, तर शंभर जण जखमी झाले हाेते. अनेक दहशतवादी संघटनांनी देशात घातपात घडविण्याची धमकी दिली अाहे. एेन रमजान महिन्यात विशेषत: जम्मू-काश्मीर येथील रहिवासी असलेले हे तरुण शहरातून बेपत्ता झाल्याने पाेलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील गर्दीच्या ठिकाणी पाेलिस बंदाेबस्त वाढविला अाहे.

इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेत सहभागी हाेण्यासाठी भारतातील तरुणांचा वाढता कल दिसून येत अाहे. त्या अनुषंगाने पाेलिस यंत्रणा सर्व शक्यतांची पडताळणी करीत अाहे. हे तरुण नाशिकला जाऊन पुन्हा मालेगावी परत अाले हाेते. यानंतर ते कर्नाटक राज्यात जाणार असल्याची माहिती समाेर अाली अाहे. त्यामुळे पाेलिस तिघा तरुणांची कसून चाैकशी करीत असून, बेपत्ता झालेल्या तरुणांच्या शाेधासाठी पथके तयार करून प्रमुख ठिकाणी पाठविण्यात अाली अाहेत.