आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदरसूल येथे अपघातात दोन ठार, नाशिक-अाैरंगाबाद महामार्गावरील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - नाशिक-अाैरंगाबाद महामार्गावर अंदरसूल येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघातात दोन ठार तर एक जण जखमी झाला आहे. कार चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला.

औरंगाबादहून येवल्याकडे येणारी कार (एम एच २० सी एच ८८८८) व वैजापूरहून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या दाेन दुचाकी (एम एच २० डी क्यू ९४१५) व (एम एच १७ एएस ०१७३) यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दाेन जणांचा मृत्यू झाला. सूर्यभान गोविंद शिंदे (५५) हे जागीच ठार झाले. त्यांच्या मागे बसलेले अरुण दगडूजी भाटे (५४) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मृत सूर्यभान शिंदे हे वैजापूर येथे विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी होते. तर जखमी सोपान रावजी शिंदे (६५) हे अचलगाव (ता. कोपरगाव) येथील असल्याचे समजते. त्यांना पुढील उपचारासाठी शिर्डी येथे हलविण्यात आले आहे.