आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Men Arrested In The Connection Of Woman Murder Case

सुरगाणा तालुका: महिलेच्या खून प्रकरणी आणखी दोघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा - सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात शिक्षक पत्नीची हत्या करण्यात शिक्षकास मदत करणार्‍या आणखी दोघांना सुरगाणा पोलिसांनी अटक केली आहे. उंबरठाण परिसरातून त्यांना अटक करण्यात आली.
सुरगाणा तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राजेंद्र राऊत याने पत्नीची चिराई घाटात हत्या केली होती. याबाबत गुरुवारी पोलिसांनी संशयितास न्यायालयात हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

या हत्येबाबत पोलिस उपनिरीक्षक एस. डी. अहिरे, कर्मचारी दिनकर महाले, अण्णा जाधव, सुखदेव जाधव, तुषार झाल्टे, विशाल लासुरकर, पंढरीनाथ तुंगार यांच्या पथकाने गुन्ह्यात वापरलेला सुरा व सोन्याचे दागिने शोधण्याची मोहीम चिराई घाटात हाती घेतली होती; मात्र त्यांना काहीही मिळून आले नाही. त्यामुळे राजेंद्र हा चुकीची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक शाहुराव साळवे यांनी याबाबत चौकशी केली असता या हत्या प्रकरणात राजेंद्रला मदत करणार्‍या दोघांना उंबरठाण परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यात वापरलेला सुरा व दागिने मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.