आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Offenders Arrested Due To Blackmailing Lady Over The Sexual Video

युवतीचे अश्लील चित्रण करून खंडणीची मागणी करणारे दोघे आरोपी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - शहरातील एका तरूणीचे अश्लील व्हिडिओ चित्रण करून बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी यावल पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पीडित तरुणीच्या वडिलांकडून 50 हजारांची खंडणी मागण्यापर्यंत आरोपींनी मजल गाठली होती. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तीन जणांविरूद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


मुख्य सूत्रधार रफीक खान सरदार खान उर्फ बबलू (वय 23) याला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारी 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर दुसरा आरोपी शेख जाकीर शेख मुशीर याला सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेण्यात आले. तिसरा आरोपी शेख सलमान फरार झाला आहे. पालिका व्यापार संकुलातील ‘अनस मोबाइल शॉपी’चा संचालक रफीक खान सरदार खान याचे शहरातील एका 19 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याचे साथीदार शेख जाकीर शेख मुशीर व शेख सलमान यांनी संगनमत करून तरुणीला लग्नाचे आमीष दाखवले. त्यांनी संबंधित तरुणीचे मोबाइलमध्ये अश्लील चित्रण केले. तरुणीचे लग्न ठरत असताना हे चित्रण जाहीर करण्याची धमकी देत तिघांनी पीडित तरुणीच्या वडिलांकडून खंडणी मागितली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


आरोपीचे दुकान सील
आरोपीच्या घरी आणि दुकानात पोलिसांनी तपासणी करून कॅमेरा, संगणक, मोबाइल आणि मारुती ओम्नी असा मुद्देमाल जप्त केला. तसेच अनस मोबाइल शॉपी हे आरोपीचे दुकान पोलिसांनी सील केले. काही दिवसांपूर्वी आरोपी चोरीचे मोबाइल खरेदी- विक्री करत असल्याच्या संशयावरून जळगाव पोलिसांनीही अनस मोबाइल शॉपीची तपासणी केली होती.


अन्य आरोपींचाही शोध
अद्याप तीन आरोपी समोर आले आहेत. आणखी कुणाचा समावेश आहे का? याचा शोध घेतला जाईल. तसेच अन्य आणखी काही तरूणी आमिषाला बळी पडल्या आहेत का, किंवा आणखी कुणाचे अश्लील चित्रण केले आहे का? या बाबी तपासल्या जातील, अशी माहिती पोलिस अधिकारी देवेंद्र शिंदे यांनी दिली.