आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- दिल्लीत प्रारंभ झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली या रणजी करंडकाच्या लढतीत महाराष्ट्राकडून मुर्तुझा ट्रंकवाला अाणि सत्यजित बच्छाव या दाेन नाशिककर क्रिकेटपटूंना एकाचवेळी संघात खेळण्याची संधी मिळाली अाहे. तब्बल १२ वर्षांनंतर एकापेक्षा जास्त नाशिककर खेळाडू महाराष्ट्राच्या संघातून एकाच सामन्यात खेळण्याचा याेग जुळून अाला अाहे.
नाशिकचे मुर्तुझा ट्रंकवाला (सलामीचा फलंदाज) अाणि सत्यजित बच्छाव ( फिरकी गाेलंदाज) यापूर्वीदेखील महाराष्ट्राकडून रणजी सामना खेळले अाहेत. मात्र, दाेघेही एकाच सामन्यात खेळण्याचा याेग अद्यापपर्यंत अालेला नव्हता. ताे या सामन्यामुळे जुळून अाला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात दिवसाच्या उत्तरार्धात गाेलंदाजीची संधी मिळालेला फिरकी गाेलंदाज सत्यजित बच्छावने ११ षटकांत ४० धावा देताना दाेन षटके निर्धाव टाकली अाहेत. मात्र, त्याला पहिल्या दिवशी एकही फलंदाज टिपता अालेला नाही.
यापूर्वी घडलेला याेगायाेग
या सामन्यापूर्वी नाशिकचे तीन खेळाडू एकाच सामन्यात एकत्रित खेळण्याची संधी २००५-२००६ साली अाली हाेती. त्यावेळी सुयश बुरकुल (जलदगती गाेलंदाज), अमित पाटील (मधल्या फळीतील फलंदाज) अाणि अभिषेक राऊत (अाॅलराऊंडर) यांना तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्र या नाशिकला झालेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली हाेती. तर त्याअाधी थेट १९६९ साली जयंतीलाल (फिरकी गाेलंदाज) अाणि अन्वर शेख (जलदगती गाेलंदाज) हे दाेघे नाशिकचे क्रिकेटपटू रणजीचा पूर्ण हंगाम खेळले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.