आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने अपहार प्रकरणी दोन पोलिस कर्मचारी निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सराफी कारागिरांच्या चौदा तोळे सोन्याच्या अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले सायबर क्राइमचे पोलिस कर्मचारी प्रदीप ठाकरे, सागर निकुंभ या दोघांना साेमवारी (दि. ५) तडकाफडकी निलंबित करण्यात अाले. पोलिस उपआयुक्तांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश काढले. हे दोघे कर्मचारी फरार असून, गुन्हे शाखेकडून त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सराफी कारागिराच्या २० ताेळे सोन्यापैकी १४ तोळे साेने खोटे असल्याचे सांगून कारवाई करण्याची धमकी सागर निकुंभ आणि प्रदीप ठाकरे यांनी दिली हाेती. शनिवारी (दि. ३) संगमनेर येथील सराफी कारागीर रियाजउद्दीन नूरउद्दीन यांना संशयित पोलिस कर्मचारी सागर निकुंभ, प्रदीप ठाकरे यांनी सोने खोटे असल्याचे सांगत फौजदारी कारवाई करण्याची धमकी देत संशयित सैफउद्दीन ऊर्फ राजू नजरुल इस्माल, हसननवाज चिकनवाला, शिवदास सातपुते, अाशिष निकुंभ यांच्याशी संगनमत करून १४ तोळे सोने ठेवून घेत फसवणूक केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांसह संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांना अटक करण्यात आली आहे, मात्र दोघे पोलिस कर्मचारी फरार आहेत. गुन्हे शाखा युनिट च्या पथकाकडून फरार झालेल्या या दाेन कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान निकुंभ, ठाकरे या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी उपआयुक्त विजय पाटील यांनी दोघांच्या निलंबनाची कारवाई पूर्ण केली. या प्रकरणी आणखी पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

या साेने अपहार प्रकरणात कारवाईदरम्यान पाेलिसांकडून दोघांची स्वतंत्र चौकशी केली जाणार अाहे. यामध्ये आणखी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...