आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यावरील खड्डय़ांमुळे दोन महिलांची रिक्षातच झाली प्रसूती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव - रस्त्यावरील खड्डय़ांत रिक्षा आदळल्याने दोन महिलांची प्रसूती रिक्षातच झाल्याचा प्रकार रविवारी येथील परिसरात घडला. दोन्हीही महिलांना तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दोन्ही मातांची तसेच बाळांचीही प्रकृती उत्तम आहे. परंतु, खराब रस्त्यामुळे संबंधित मातांचे मात्र हाल झाल्याने हा रस्ता दुरुस्त तरी केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

येथील आदिवासी हौसिंग सोसायटीतल्या संगीता संतोष निरभवणे या गरोदर खड्डय़ांमुळे दोन महिलांची रिक्षातच प्रसूती होत्या. रविवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने संगीताला जवळच असलेल्या एका रिक्षातून तातडीने लासलगाव- निमगाव वाकडा रस्त्याने प्राथमिक आरोग्य कें द्रात नेण्यात येत होते. परंतु, रस्त्यातील एका मोठय़ा खड्डय़ात रिक्षा आदळल्याने संगीताला प्रसूतीच्या कळा सुरू होऊन तिने रिक्षातच मुलाला जन्म दिला. रिक्षाचालक सुरेश झांबरे यांनी तातडीने निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य कें द्रात रिक्षा नेली. डॉ. मनीषा वाघ व आरोग्यसेविका एस. पी. जाधव यांनी तातडीने बाळाची नाळ कापून उपचार सुरू केले.

दुसरी अशीच घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. आंबेगाव (ता. येवला) येथील सविता महेंद्र गिते या प्रसूतीसाठी रिक्षातून याच दवाखान्यात जात होत्या. परंतु, खराब रस्त्यामुळे लासलगावजवळ रिक्षातच त्यांची प्रसूती होऊन त्यांनी मुलाला जन्म दिला. रिक्षाचालकाने त्यांना तातडीने निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

आंदोलनानंतरही दुर्लक्ष
लासलगाव- निमगाव वाकडा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याच्या दुरु स्तीची मागणी अनेक दिवसांपासून आहे. शिवसेना व भाजपने खराब रस्त्याच्या निषेधार्थ रस्त्यांवरील खड्डय़ांत वृक्षारोपण करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, त्याचाही परिणाम झाला नाही.


माता व बालके सुखरूप
रविवारी सकाळी 8 व दुपारी 12 वाजेदरम्यान दोन महिलांची रिक्षातच प्रसूती झाली. तातडीने उपचार झाल्याने दोन्हीही माता व बालके सुखरूप आहेत. डॉ. मनीषा वाघ, वैद्यकीय अधिकारी, निमगाव वाकडा