आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Suspects Arrested In Case Of Looting 16 Crores Gold

१६ काेटी रुपयांच्या साेने लूट प्रकरणी दाेन संशयितांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई-अाग्रा महामार्गावरील वाडीव-हे शिवारात सुमारे १६ काेटी रुपये साेने लुटीच्या प्रकरणात दाेघा संशयितांना मुंबईतून अटक करण्यात अाली. त्यानंतर या टाेळीचा लवकरच पर्दाफाश करण्यात येणार असल्याचा दावा पाेलिस अधीक्षकांनी केला असून, याप्रकरणी दाेघांना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता १२ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात अाली. दरम्यान, संशयितांच्या शाेधासाठी उत्तर प्रदेशासह विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात अाल्याचेही सांगण्यात अाले.
अंधेरी येथून झी गाेल्ड कंपनीतून ६० किलाे साेन्याची िबस्किटे घेऊन ‘सिक्वेल सिक्युरिटी’ची बंदाेबस्तात गाडी शुक्रवारी(िद. २४) पहाटेच्या सुमारास शिरपूरला रिफायनरीकडे येथे जात हाेती. त्याच वेळी महामार्गावरच वाडीवऱ्हेनजीक रायगडनगर येथे अंबर दिवा लावलेल्या कारमधून पाेलिस पाेषाखात अालेल्या पाच जणांनी गाडी अडविली. साेन्याची बिस्किटे घेऊन जाणाऱ्या शस्त्रधारी कर्मचारी इतरांना गाडीतून उतरण्यापूर्वीच पाेलिस पाेषाखातील संशयितांनी पिस्तुलाचा धाक दाखवित त्यांचे हातपाय बांधून ताेंडात रूमाल काेंबून गाडीत बसविले. तर, दाेघा-तिघांनी गाडीतील साेन्याची बिस्किटे असलेली बॅग िहसकावून काही मिनिटांतच पळ काढला. यामध्ये सुमारे १६ काेटी रुपयांचे साेने शिरपूरच्या रिफायनरीत शुद्धतेसाठी जात असतानाच दराेडेखाेरांनी पळविल्याचा प्रकार उघडकीस येताच सर्वत्र खळबळ उडाली.
पाेलिसांनी महामार्गावर ठिकठिकाणी नाकेबंदी करीत वाहने तपासणी सुरू केली. वेगवेगळ्या भागात पथके रवाना केलीत. त्याचबराेबर अंधेरी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात अाला असून, फिर्यादीची सखाेल चाैकशी करण्यात अाली. या प्रकरणी पाेलिस अधीक्षक संजीव माेहिते यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पाेलिस अाणि स्थानिक गुन्हा शाेध पथकाचे अधिकारी-कर्मचारी गुन्ह्याचा तपास करीत अाहेत.

गुन्हेगार उत्तर प्रदेशातील
संशयितांकडूनटाेळीचा पर्दाफाश हाेण्यास मदत मिळणार असली तरी तूर्त मुद्देमाल हाती लागलेला नसल्याने पाेलिसांकडून गाेपनीयता पाळली जात अाहे. या गुन्ह्यात मुंबई, धुळे येथील चाैघांसह उत्तर प्रदेशातील काही जणांचा समावेश असण्याची शक्यता अाहे. संशयितांचे धागेदाेरे हाती लागले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पथक पाेहाेचले नसल्यानेच गुन्हा उघडकीस येण्यास विलंब हाेत असल्याचे मानले जात अाहे.