आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ लाखांच्या चोरीप्रकरणी दोघे जेरबंद, सातपूर अंबड पोलिसांची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; सिडकोच्या राणेनगरातील इक्विटोस मायक्रो फायनान्स कंपनीत झालेल्या १२ लाख ६६ हजार ८९० रुपयांच्या चोरीप्रकरणी अंबड सातपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कार, रक्कम मोबाइल हस्तगत करण्यात आले असून, पैशांच्या लालसेने कंपनीतील कर्मचाऱ्यानेच चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

२६ नोव्हेंबर रोजी सोनल साखळे यांनी याबाबत अंबड पोलिसांत फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी तपास सुरू केला होता. त्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित कर्मचारी सचिन लक्ष्मण टेकाडे (रा. इंदिरानगर) त्याचा मित्र अतुल बाबूराव निकम (रा. अंबड) या दाेघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दोन कार, ७० हजार रुपये तीन महागडे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

लोभापोटीचोरी :दोन्ही मित्रांनी पैशाच्या लोभापोटी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. सचिन टेकाडे हा कर्मचारी होता, त्यामुळे त्याने कपाटाच्या चाव्यांची चोरी केली मित्र अतुल निकमच्या मदतीने पैसे चोरले.