आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टंकलेखन परीक्षार्थींना प्रतीक्षा नव्या तारखांची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: पेपरच फुटल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या टंकलेखन परीक्षेच्या नव्या तारखेकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर दोन आठवड्यांत नव्या तारखा जाहीर होतील, असा अंदाज नाशिक जिल्हा टाइपरायटिंग इन्स्टिट्यूटचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश देवरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टंकलेखनाच्या परीक्षा दि. 22 मे ते 25 मे या चार दिवसांच्या काळात होणार होत्या. त्यानुसार शहरातील परीक्षा केंद्रांवरही या परीक्षांचे नियोजनही करण्यात आले होते. दीड दिवस ही परीक्षा पार पडल्यानंतर पेपरफुटीच्या कारणामुळे या परीक्षाच रद्द करण्यात आल्या. यामुळे शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विद्यार्थ्यांना खूपच मन:स्ताप सहन करावा लागला होता.
या प्रकारामुळे जिल्हाभरातील टाइपरायटिंग इन्स्टिट्यूटमधून परीक्षेसाठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. नव्याने होणार्‍या परीक्षेसाठी पुन्हा तयारी करावी लागणार असल्याने आणि नवीन शैक्षणिक वर्गांचे प्रवेशही या टप्प्यात सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांचे वेळापत्रक पुन्हा कोलमडणार आहे.