आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Can Control Flow Of Other Parties People

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेतील खोगीरभरतीला उद्धव ठाकरेच लावणार लगाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातसत्ता महापालिका निवडणुकीत शिवसेनेचाच ‘आवाज’ राहील, असा अंदाज बांधून पक्षात येणा-यांना आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेनेत येणा-या प्रत्येकाच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे पुढील निवडणुकीत विजयी होण्याची क्षमताही तपासण्याचे दंडक आता स्थानिक पदाधिका-यांना घालून देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील खोगीरभरतीला लगाम लागण्याची चिन्हे आहेत.
महापाैरपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे नगरसेवक कन्हैया साळवे वैशाली भागवत यांनी बंड केले होते. दोघांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर बुधवारी (दि. ४) शिवबंधनात गुंफण्यात आले. अर्थात, वैशाली भागवत अनुपस्थित असल्या, तरी त्यांचे पती शिवा भागवत हे या सोहळ्याला हजर होते. दरम्यान, सद्यस्थितीत महापालिकेचा विचार केला, तर सत्ताधारी मनसेत मोठी अस्वस्थता आहे.
मध्यंतरी मनसेतील एक मोठा गट पक्षांतर करेल, असेही बोलले जात होते. भाजपात सध्या सुरू असलेले शीतयुद्ध बघता शिवसेनेत हा गट येण्याची शक्यता आहे. तशी शक्यताही ठाकरे यांनी लक्षात घेऊन येणा-या प्रत्येकाची गुणवत्ता तपासावी पक्षाला भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, अशाच व्यक्तींची निवड करावी, असाही कानमंत्र दिला. त्यामुळे शिवसेनेतील खोगीरभरतीवर लगाम लागण्याची शक्यता आहे. या वेळी संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार विनायक राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

इच्छुकांना प्रतीक्षा
दरम्यान,शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी डझनभर नगरसेवक अनेक पदाधिकारी शिवसेनेत येणार असल्याचे या प्रवेश सोहळ्यावेळी सांगितले. त्यावर ठाकरे यांनी पक्षात येणा-यांची क्षमता तपासण्याची सूचना केली आहे.

प्रवेश करणा-या चौघांनाही मिळणार सत्तेची पदे...
नाशिकरोड | शिवसेनेतअधिकृत प्रवेश करणा-या काँग्रेस मनसेच्या प्रत्येकी दोन नगरसेवकांना शिवसेनेने सत्तेच्या पदांचे अाश्वासन दिले आहे. पुढील महिन्यात होणा-या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत वैशाली भागवत यांच्या सभापतिपदाच्या, तर कन्हैया साळवे यांच्या स्थायी समिती सदस्यपदाच्या आश्वासनाची पूर्ती केली जाणार आहे. दाेन महिन्यांपूर्वीच मनसेचे नगरसेवक संपत शेलार शोभना शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला हाेता. त्यांनाही पुढच्या वर्षीच्या निवडणुकीत अनुक्रमे प्रभाग सभापती स्थायी समिती सदस्यपदाचे आश्वासन दिले आहे.

चार नगरसेवकांच्या प्रवेशामुळे नाशिकरोड प्रभागात शिवसेनेचे स्पष्ट बहुमत झाले आहे. प्रभागातील २४ नगरसेवकांपैकी शिवसेनेची सदस्यसंख्या ११ झाली आहे. तर, काँग्रेसची पाटी कोरी झाली आहे.

साळवेंचात्रिकोण पूर्ण : साळवे२००२ मध्ये भाजपच्या तिकिटावर, २००७मध्ये अपक्ष, तर २०१२ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढले आहेत.

प्रवेशापूर्वीच आश्वासन
प्रवेशापूर्वीस्थानिक पदाधिका-यांनी अाम्हाला प्रभाग सभापती स्थायीचे सदस्यपद देण्याचे अाश्वासन दिल्याने बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. कन्हैयासाळवे, नगरसेवक