आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Azam Khan, Divya Marathi

आझम खान विरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा - उध्‍दव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सीमेवर लढणार्‍या सैनिकांचा मुस्लिम धर्माशी संबंध लावणार्‍या सपाच्या आझम खान यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे, असा समाचार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतला. येथे खासगी कामानिमित्त आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.


ठाकरे म्हणाले की, सैनिक कोणत्याही धर्माचा वा जातीपातीचा विचार न करता प्राण पणाला लावत असतात. मात्र, त्यांच्याबद्दल असे बेताल वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. तसेच भंडारा येथे इव्हीएम मशीनचे कोणतेही बटण दाबल्यास ते मत राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला पडत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे सांगताना परदेशातही बॅलेट पेपरवरच मतदान करण्याची पध्दत रूढ आहे; त्यामुळे निवडणूक आयोगाने त्याचाही विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाण यांना शरद पवार यांनी क्लीन चिट देऊन सत्तेचा गैरवापर केला, तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांच्या मुलीने युतीकडून उमेदवारी केली म्हणून गावितांवर कारवाई केली; परंतु पद्मसिंह पाटीलसारख्या खुनाच्या आरोपीला मात्र उमेदवारी बहाल करण्यात आली.