आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Balasaheb Wagh, Divya Marathi

बाळासाहेब वाघांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध उघड उघड बंड करत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणारे सिन्नर पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांनी शनिवारी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल ताजमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे वाघ यांच्या सेना प्रवेशाविषयी चर्चा सुरू झाली आहे.


कॉँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे सर्मथक आणि निष्ठावान समजले जाणारे बाळासाहेब वाघ यांनी थेट आघाडीच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतल्याने लोकसभा मतदारसंघाचे चित्र काहीसे पालटले आहे. तसे पाहता कोकाटे आणि आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांचे फारसे सख्य नाही. यापूर्वीही अनेकदा या दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून वाद निर्माण झालेला आहे. आताही निवडणुकीच्या तोंडावर दोघे एकत्र आले, मात्र पुन्हा वाद सुरू झाल्याने कोकाटेंच्या सर्मथकांनी उघड उघड बंड पुकारले आहे. अर्थात, त्याला संदर्भ हा सिंधुदुर्ग येथील निवडणुकीचा जोडला जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दीपक केसरकर यांनी राणे यांच्याविरुद्ध भूमिका घेतल्याने राणे सर्मथक असलेल्या कोकाटे यांच्या सर्मथकांनी आघाडीतील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवाराला नाशिकमध्ये कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचदृष्टीने वाघ यांनी शिर्डी येथील उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या उद्धव ठाकरे यांची नाशिक येथील हॉटेल ताजमध्ये भेट घेत चार भिंतीआड चर्चा केली. या वेळी त्यांच्यासोबत स्थानिक काही पदाधिकारीदेखील उपस्थित होते.