आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Divya Marathi

महाराष्ट्र सर्वात पुढे.. भ्रष्टाचार, आत्महत्यांत, उध्‍दव ठाकरेंचे आघाडीवर शरसंधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - ‘आघाडी सरकारचा भ्रष्टाचार, महिलांची असुरक्षितता, शेतक-याच्या आत्महत्या.. हे सर्व काही राज्यात घडत असताना ‘महाराष्ट्र पुढे’ अशी गर्जना आघाडी सरकारकडून केली जात आहे. जनतेने मात्र सत्ताधा-याच्या या भूलथापांना बळी न पडता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता आणावी’, असे आवाहन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले.

घोटी (जि. नाशिक) येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. नाशिकच्या विकासाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, नविडणुकीच्या तोंडावर अनेक नेते शिवसेनेत येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून बंडखोरांना कधीही स्थान दिले जाणार नाही. नाशिकच्या विकासासाठी प्रयत्नशील असून, संपूर्ण नाशिक शहर भगवेमय करण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमास खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, रामदास कदम, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मरि्लेकर, माजी आमदार राम पडांगळे, बबन घोलप, निवृत्ती जाधव, सत्यभामा गाडेकर, खासदार हेमंत गोडसे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, आमदार शिवराम झोले, सुधाकर बडगुजर, विनायक पांडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

आश्रमशाळेत घाेटाळे
राज्यांतील आश्रमशाळांची िस्थती अतशिय वाईट आहे. या आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सूरू आहे. आदविासींच्या याेजनांमध्येही मोठ्या प्रमाणावर घाेटाळे आहेत. यासाठी िचकी याेजनेचे उदाहरण देत उद्धव यांनी िचकी घाेटाळ्यातील समितीचा अहवाल येऊनदेखील शासन कारवाई करत नसल्याचा आराेप केला.

पाेिलसांवर टीका
डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येला एक वर्ष उलटले तरी अद्याप मारेक-याचा शाेध लावण्यात पाेिलसांना यश आलेले नाही. हे पाेिलस यंत्रणा व सरकारचे अपयश आहे, अशी टीकाही उद्धव यांनी केली.

चंद्रकांत खाडेंचा प्रवेश
वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी या मेळाव्यात असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी खाडे म्हणाले की, आदविासी समाजाकरिता यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या याेजना राबवल्या आहेत. यापुढेही हे कार्य कायम राहील व शिवसेनेशी प्रामाणिक राहून आदविासींच्या हक्कासाठी लढा देणार.

वस्तूंचे वाटप
घाेटी येथील बाजार समिती आवारात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तीन हजार गरजू आदविासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.