आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thakare Come For Loksabha Election In Nashik

लोकसभा निवडणूक तयारीसाठी नाशिकामध्‍ये येणार उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या पायाभरणीसाठी पक्षाचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे ऑगस्टमध्ये नाशिकला येणार असून, त्यांच्या उपस्थितीत बूथप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संपर्कप्रमुख मिर्लेकर यांनी दिली. या मेळाव्याची रंगीत तालीम म्हणून 16 ऑगस्टनंतर बूथप्रमुखांचे विभागनिहाय मेळावे घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मिर्लेकर यांच्या उपस्थितीत नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम, नाशिकरोड-देवळाली, सिन्नर व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी त्यांनी बूथप्रमुखांशी चर्चा केली. नेमलेले बूथप्रमुख, राहिलेल्या नेमणुका याचाही आढावा त्यांनी घेतला. एका बूथप्रमुखाला जवळपास 1500 मतदारांशी संपर्क ठेवावयाचा असल्यामुळे हे जाळे मजबूत करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकार्‍यांना दिल्या. बूथप्रमुखांच्या नियुक्तीचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित नियुक्त्या लवकर करण्याचे आदेश त्यांनी दिले. महिला गटप्रमुखांच्याही नेमणुकाही लवकरच केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.