आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thakare Now Starts His Loksabha Election Compaign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरे आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिका-यांचा घेणार मेळावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक / नाशिकरोड - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारपासून नाशिक दौर्‍यावर येणार असून, रविवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुख व पदाधिकार्‍यांचा मेळावा होणार आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई मेळाव्याला उपस्थिती राहणार आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुखांना मार्गदर्शन करून आगामी वर्षभरात पक्षाच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण करणे व जनसामान्यांच्या समस्यांवर शिवसैनिकांना आक्रमक होण्याचे आवाहन करण्याकरिता ठाकरे यांचा मेळावा आयोजित केल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. शनिवारी सकाळी 11 वाजता ठाकरे यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर सिन्नरमार्ग शिर्डी येथील मेळाव्याला जाणार आहेत.

मेळावा संपल्यानंतर पुन्हा नाशिक येथे सायंकाळी ठाकरे यांचा मुक्काम असून, दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी 11 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुखांचा मेळावा होणार आहे.


बैठकीत नियोजन
देवळाली व पंचवटी मतदारसंघातील विभागप्रमुख,उपविभागप्रमुख,शाखा प्रमुखांची बैठक जिल्हाप्रमुख विजय करंजकर,माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत नाशिकरोड शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या वेळी ओझर, जत्रा हॉटेल चौक, नांदूरनाका, दसक, बिटको चौक, शिंदे, पळसे व सिन्नर येथे उद्धव ठाकरे यांचे स्वागताचे नियोजन करण्यात आले.