आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच नाही, तर उत्तर महाराष्ट्र जिंकायचाय, उद्धव ठाकरे यांनी नाशकात फुंकले रणशिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिकाच नाही तर उत्तर महाराष्ट्र जिंकायचाय अाणि माझा शिवसैनिक ताे जिंकणारच, असा एल्गार करीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी नाशिकमध्ये अागामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
युती करायची की नाही, हे शिवसैनिकांच्या मनावर अवलंबून असल्याचे सांगतानाच, सरकार जरी अापले असले तरी हाेणाऱ्या चुकांचा अारसा शिवसेना दाखविणारच, असे सांगतानाच शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी नसून, अाम्ही युती केली ती हिंदुत्वासाठी, सत्तेसाठी नाही, काही जण युती ताेडा असा सल्ला देतात; पण काय निर्णय घ्यायचा ताे याेग्य वेळी घेईल, असा टाेलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. चाेपडा बँक्वेट हाॅल येथे झालेल्या शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी अाणि लाेकप्रतिनिधी शिबिरात ठाकरे मार्गदर्शन करीत हाेते. व्यासपीठावर बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गाेडसे, अामदार गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख अजय चाैधरी, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, रवींद्र मिर्लेकर, महानगरप्रमुख अजय बाेरस्ते अादी हाेते.

१९९४ मध्ये शिवसेनेने नाशकातच प्रचाराचा नारळ वाढवला हाेता, त्यानंतर राज्यात युतीची सत्ता अाली हाेती, याची अाठवण करून देत नाशिकची महापालिकाच नाही तर उत्तर महाराष्ट्र जिंकण्यासाठीच हे शिबिर असल्याचे ठाकरे म्हणाले. राज्यात राष्ट्रवादी अाणि काँग्रेसचे जाेखड मानेवर घ्यायची अामची तयारी नसून, अाम्ही सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वासाठी युती केली. हिंदूंची मते फुटू नयेत ही अापली भूमिका असून, सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करणार नाही, असे ठाकरे म्हणाले. पुढचा मुख्यमंत्री उत्तर महाराष्ट्राचाच असल्याचे सांगत जिंकायचे असेल तर कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं, असा कानमंत्र त्यांनी शिवसैनिकांना दिला.

{ १९९४ ला नाशिक मेळाव्यानंतर सेनेचा भगवा विधानसभेवर फडकला हाेता. त्या दृष्टीने या शिबिराला महत्त्व.
{ नाशिक हे शिवसेनेसाठी पवित्र ठिकाण अाहे.
{ नाशिक हे सेनाप्रेमी अाहे. नाशिककरांचे मन जिंकणे अामच्यासाठी महत्त्वाचे अाहे.
{ मधल्या काळात सेनेबाबत नाराजी व्यक्त झालीही असेल. परंतु, अाता पुन्हा अशा चुका हाेणार नाही, असा शब्द मी देताे.
{ दुष्काळाच्या बाबतीत काँग्रेस, राष्ट्रवादीनेही एकत्र येऊन हे संकट दूर करण्यासाठी विचार करावा.
{ भुजबळ कुटुंबीय त्यांच्या कर्माची फळे भाेगताहेत. ताे विषय अाता किती दिवस चघळायचा?
शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी...