आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूजीसीचा भर पर्यावरणावर, अभ्यासक्रमात विषय समाविष्ट करण्यासाठी सर्व विद्यापीठांना प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यूजीसी अर्थात युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने संलग्न सर्व विद्यापीठांना त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये ‘पर्यावरण’ या विषयाचा समावेश करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. विद्यार्थ्यांना त्याचे उच्चशिक्षण घेता यावे, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून दिलेल्या या प्रस्तावानुसार सर्व विद्यापीठांना या विषयाचा समावेश करण्यासाठी अभ्यासक्रमांची पुनर्रचना करावी लागेल.

या विषयामध्ये प्रामुख्याने लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दाेन्हींचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्चशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षास या विषयाची सक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांना त्याअंतर्गत ५० उपविषय असतील. लवकरच त्यामध्ये प्रदूषण, पर्यावरण व्यवस्था, सामाजिक प्रश्न ज्यांमध्ये पाणीप्रश्न तसेच इतर विषय हाताळले जातील. अशा विषयांचा समावेश करून हे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे.

‘राेप जाेपासावे’
यूजीसीअंतर्गत येणाऱ्या देशभरातील ७०६ विद्यापीठांमध्ये पर्यावरण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोपटे लावून ते जाेपासावे, अशा सूचना देण्यात आल्या. विद्यापीठांनी त्यासाठी अावश्यक जागा द्यावी त्याबाबत याेग्य िनर्णय घ्यावा, असेही प्रस्तावित अाहे.

अभ्यासक्रम बदल
काहीविद्यापीठांमध्ये आजही पर्यावरण हा विषय शिकवला जातो. नव्या िनयमानुसार त्यांना या अभ्यासक्रमांत बदल करून यूजीसीने दिलेल्या सूचनांनुसार नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी त्यांना मुदतदेखील देण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद अाहे.