आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. उमेश मराठे यांची कारागृहात रवानगी, डाॅक्टरांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांसह डाॅक्टरांची गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लग्नाचे अामिष दाखवून घटस्फाेटित युवतीवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी नगरसेवकपुत्र अजिंक्य चुंभळे याचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून, याच गुन्ह्यात अटक केलेल्या डाॅ. उमेश मराठे यांच्या जामिनावर २८ तारखेला सुनावणी ठेवण्यात अाली अाहे. डाॅ. मराठे यांची जिल्हा रुग्णालयातून मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात अाली असून, त्यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांसह खासगी डाॅक्टरांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केल्याने शहरातील रुग्णसेवा काही काळ विस्कळीत झाली हाेती.
इंदिरानगर पाेलिस ठाण्यात नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य याच्याविरुद्ध युवतीवर बलात्कार अाणि गर्भपाताच गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी अजिंक्य याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश यू. के. नंदेश्वर यांनी फेटाळाला असला तरी याच न्यायालयाने त्याच्या शुक्रवारी (दि. २५) हाेणाऱ्या लग्नसमारंभाासाठी उच्च न्यायालयात जाण्यासाठी पाच दिवसांचा तात्पुरता जामीनही मंजूर केला. पाेलिस तपास थंडावला असून, याच प्रकरणात गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात अाालेल्या स्त्रीराेगतज्ज्ञ डॉ. उमेश मराठे यांना तीन दिवसांच्या पाेलिस काेठडीनंतर न्यायालयीन काेठडी सुनावली. बुधवारी (दि. २३) डाॅ. मराठे यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता तिथेच त्रास झाल्याने त्यांना कारागृहाएेवजी रुग्णालयातच दाखल करून घेण्यात अाले हाेते. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच डाॅ. मराठंना भेटणाऱ्यांची रीघ लागल्याने त्यांच्यावर संशयित अजिंक्य चुंभळे अथवा त्याच्या समर्थकांकडून दबाव येण्याची शक्यता लक्षात घेता पाेलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश जगदाळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून डाॅ. मराठेंची प्रकृती ठीक असल्याने त्यांना रुग्णालयातून साेडण्यास कुठलीही हरकत नसल्याचे डाॅ. जगदाळे यांनी सांगितले. त्यानुसार तत्काळ दुपारनंतर डाॅ. मराठे यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात अाली. डाॅ. मराठे यांच्या वतीने सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता साेमवारी (दि. २८) त्यावर सुनावणी अाहे. त्यामुळे डाॅ. मराठेंचा कारागृहातील मुक्काम पाच दिवस तरी वाढला अाहे.

अजिंक्यच्या लग्नावर अनिश्चिततेचे सावट
बलात्कार प्रकरणातील संशयित अजिंक्य यास केवळ त्याच्या लग्नाच्या कारणानिमित्त सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांनी तात्पुरता जामीन मंजूर केल्याने चुंभळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला अाहे. याच कालावधीत त्यास पाेलिस ठाण्यात दरराेज हजेरी लावण्याचे पासपाेर्ट जप्तीचे अादेश दिले. दरम्यान, या प्रकरणाने चुंभळे कुटुंबीयांवर अाेढावलेली नामुष्की लक्षात घेता शुक्रवारी (दि. २५) अालिशान हाॅटेलमध्ये हाेणारा शाही साेहळा अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकला अाहे. लग्न रद्द झाल्यास अटकपूर्व रद्द करण्याचीही पाेलिसांनी तयारी सुरू केली अाहे. दरम्यान, शुक्रवारीच चुंभळेकडून हायकाेर्टात अर्ज दाखल केला जाण्याचीही शक्यता वर्तवली जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...