आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेकायदेशीर गर्भपात, डाॅ. उमेश मराठे यांना पाेलिस काेठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घटस्फाेटित महिलेला लग्नाचे अामिष दाखवून तिच्यावर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवकपुत्र अजिंक्य चुंभळे यास न्यायालयाने दिलासा दिला असला तरी या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले अाहे. गर्भपात करणाऱ्या डाॅ. उमेश रमेश मराठे यास पाेलिसांनी अटक केली. संशयित डाॅ. मराठे यांनी चुंभळे यास मदत केल्याचे तपासात उघडकीस अाले असून, न्यायालयाने साेमवारी तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले शिवाजी चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य याच्याविरुद्ध बुधवारी (दि. १६) इंदिरानगर पाेलिस ठाण्यात बलात्कार अाणि गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याच गुन्ह्यात पीडितेच्या तक्रारीनुसार, लग्नाचे अामिष दाखवून नाशिक, मुंबई पुण्यातील वेगवेगळ्या हाॅटेल्समध्ये संशयित अजिंक्यने बलात्कार केला. त्यातच गर्भवती राहिल्यावर लेखानगर, सिडकाेतील लाइफ केअर हाॅस्पिटलमध्ये डाॅ. उमेश मराठे यांच्याकडून गर्भपात करून घेतल्याचे तक्रारीत म्हटले हाेते. पाेलिसांनी संशयित अजिंक्य यास अटक करण्यापूर्वीच त्याने न्यायालयात धाव घेतली. त्याच्या अटकपूर्व जामिनाला पाेलिस अाणि पीडितेच्या वकिलांनी जाेरदार विराेध करूनही न्यायालयाने ताे फेटाळत त्यास पाच दिवसांचा तात्पुरता अटकपूर्व मंजूर केला. न्यायालयाने त्यास दरराेज इंदिरानगर पाेलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे अादेश दिले अाहेत. दरम्यान, तपासी पथकातील सहायक अायुक्त अतुल झेंडे, इंदिरानगर पाेलिस ठाण्याच्या सारिका जाधव यांनी सखोल तपास करीत पीडितेचा जबाब नाेंदविला. पीडितेचे नाव बदल करून तिला धमकावत लाइफ केअर हाॅस्पिटलमध्ये अजिंक्य याने दाखल केले. याच ठिकाणी डाॅ. मराठे यांनी गर्भपात केल्याचे जबाबात म्हटल्याप्रमाणे पाेलिसांनी त्यांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. गर्भपातासाठी अावश्यक असलेले संमतीपत्रक इतर माहिती मागितल्यास त्यांनी टाळाटाळ केल्याचे अाणि ही प्रक्रिया कायदेशीरच असल्याचा अट्टहास धरला. यात प्रथमदर्शनी डाॅ. मराठे यांचा सहभाग अाणि चुंभळे यास मदत केल्याचे दिसून अाले. या प्रकरणी डाॅ. मराठे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करीत साेमवारी (दि. २१) त्यांना अटक करण्यात अाली. दुपारी सत्र न्यायालयात हजर केले असता तपासी पथकाकडून अाठ दिवसांची पाेलिस काेठडी मागण्यात अाली. तर, संशयिताकडून अॅड. राहुल कासलीवाल यांनी काेठडीला विराेध करीत अजिंक्यचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पाेलिसांनी दबाव टाकल्याने जामिनाची मागणी केली. अखेरीस न्यायालयाने तीन दिवसांच्या पाेलिस काेठडीचे अादेश दिले.
राजकीय वर्तुळात खळबळ : संशयितअजिंक्य याच्याविराेधात पाेलिसांनी सबळ पुरावे जमा करीत त्याच्या मुसक्या अावळण्याची तयारी केली असतानाच, न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनामुळे त्यास दिलासा मिळाला. परंतु, पाेलिस तपासात चुंभळे यास मदत करणाऱ्यांमध्ये डाॅ. मराठे यांचा सहभाग अाढळून अाल्याने त्यांना अटक करण्यात अाल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली. याच अाधारे अाता पाेलिसांकडून चुंभळे याचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी जाेरदार युक्तिवाद करण्याची तयारी चालविली अाहे. यामुळे अाता बुधवारी (दि. २३) न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले अाहे. दरम्यान, पीडित तरुणीला चुंभळे कुटुंबीयांकडून धमकावले जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास अाणून दिल्याने तरुणीला तत्काळ पाेलिस संरक्षण पुरविण्यात अाले अाहे. या प्रकरणातील अजिंक्य हा नगरसेवकपुत्र, तर डाॅ. मराठे हे शिवसेनेचे नगरसेवक सचिन मराठे यांचे बंधू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...