आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या अनधिकृत कामांवर वक्रदृष्टी, पालिका १५ दिवसांत ताेडणार ४१ कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवीन अनधिकृत बांधकामांवर हाताेडा फिरविल्यानंतर अाता महापालिकेने पुन्हा जुन्या प्रकरणांकडे आपली वक्रदृष्टी टाकली असून, अशा ४१ अनधिकृत बांधकामांवर १५ दिवसांत पालिका कारवाई करणार अाहे.
महापालिकेने अनधिकृत बांधकामे काढताना नवीन पद्धत अस्तित्वात अाणली. अनधिकृत बांधकामाची तक्रार अाल्यानंतर प्रथम नाेटीस, त्यानंतर खुलासा, प्रत्यक्ष पाहणी आणि अंतिम नाेटीस अशी लांबलचक प्रक्रिया असल्यामुळे जुन्या प्रकरणांसाठी प्रचंड वेळ लागत हाेता. अशातच जुन्या प्रकरणांवर तत्परतेने कारवाई केली तरी, नवीन प्रकरणांची संख्या वाढून त्यांचे रूपांतर जुन्यात हाेत हाेते. त्यामुळे अनधिकृत बांधकामांबाबत काेणी तक्रार केली तर वर्षभर कारवाई हाेणारच नाही, असा एक समज निर्माण झाला हाेता.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात नवीन तिमाही प्रकरणे तर, त्यानंतर पंधरावड्यात जुन्या तिमाही प्रकरणांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत नवीन ६१ बांधकामांवर कारवाई करण्यात अाली. अाता पालिकेने ऑक्टोबर ते डिसेंबर या दुसऱ्या टप्प्यातील जुन्या अतिक्रमणांवर लक्ष केंद्रीत केले असून, या कालावधीतील ४१ बांधकामांवर हाताेडा फिरणार अाहे.

१५ जूननंतर अनधिकृत धार्मिक

स्थळांवर कारवाई
अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्याबाबतची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून १५ जूननंतर प्रत्यक्ष कारवाईसाठी सुरुवात हाेईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उद्यापासून भद्रकाली नाशिकराेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत हरकतींवर सुनावणी हाेणार अाहे. २००९ नंतरच्या जवळपास तीनशे अनधिकृत धार्मिक स्थळांवर पंधरवड्यानंतर कारवाई हाेईल. त्यासाठी पुढील अाठवड्यात प्रथम महापालिका अायुक्त पाेलिस अायुक्त यांची संयुक्त बैठक हाेऊन त्यानंतर निर्णय हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...