आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गल्लाेगल्ली अनधिकृतहाेर्डिंग्जचे‘नमाे नमाे’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्याकाही दिवसांपासून नाशिक शहरात अनधिकृत हाेर्डिंगचे पुन्हा एकदा पेव फुटले अाहे. नेमके काेणते अधिकृत काेणते अनधिकृत हाेर्डिंग याचाही उलगडा झालेला नाही. मध्यंतरी परवानगी घेऊन महापालिकेने शिवसेनेला काही ठिकाणी फलक व्यासपीठ उभारण्यास परवानगी दिली हाेती. शिवजयंतीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी अनधिकृत हाेर्डिंग, झेंडे बॅनर लावलेले दिसले. मात्र, काेणाहीविराेधात ठाेस कारवाई केल्याचे पालिकेने जाहीर केले नाही.
अाता भारतीय जनता पक्षाची नाशिकमध्ये प्रदेश कार्यकारिणीची बैठक आणि एप्रिल राेजी हाेत अाहे. या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून शहरातील ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग लावून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला जात अाहे. शहरातील पंचवटी भागातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेले ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत दिसून अाले. निमाणी बसस्थानकापासून ते आैरंगाबाद नाक्यापर्यंत एका भाजप कार्यकर्त्याने चक्क विद्युत खांबांवर होर्डिंग लावल्याचे दिसून आले. तसेच जुना अाडगाव नाका परिसरातील स्वामीनारायण मंदिर हाॅल परिसरात होणाऱ्या बैठकीसाठी या परिसरातदेखील रस्त्यावर होर्डिंग लावण्यात आल्याने आता या हाेर्डिंगवर महापालिका प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरालाहाेर्डिंग्जचा विळखा; तरी प्रशासनाची साेयिस्कर टाेलवाटाेलवी
संपूर्णशहराला अनधिकृत होर्डिंग्जचा विळखा पडलेला असतानाही महापालिकेच्या रेकाॅर्डला लेखी एकही अनधिकृत होर्डिंग नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर आले अाहे. अधिकृत होर्डिंगची संख्या विचारली असता अवघे दहा ते बाराच होर्डिंग असल्याचे सांगितले जाते. परंतु, त्याबाबतही स्पष्ट भूमिका नसल्याने कोट्यवधी रुपयांचा कर यामुळे बुडत अाहेे. शहरात अाजही शेकडो अनधिकृत होर्डिंग लागले असताना प्रशासन मात्र साेयिस्करपणे टाेलवाटाेलवीच करीत अाहे.

नेत्यांसह खासगी होर्डिंग्जचाही विळखा
सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, गंगापूररोड, शरणपूररोड, भद्रकाली, द्वारका, मुंबई नाका या भागात ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने पाहणी केली असता अनेक माेठमाेठे अनधिकृत होर्डिंग्ज लागलेले दिसून आले. शहरात राजकीय नेत्यांच्या होर्डिंग्जसह खासगी वास्तू, हॉटेल, मसाज अादी जाहिरातींचेही अनधिकृत होर्डिंग पुन्हा उघडपणे झळकू लागल्याचेही ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले. मात्र, महापालिकेकडून अशा हाेर्डिंगबाजीकडेही दुर्लक्षच केले जात असल्याने शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे.

लाखो रुपयांचा महसूल पाण्यात
शहरातील पंचवटी, रविवार कारंजा, निमाणी बसस्थानक परिसर, गोदाघाटाजवळ सर्रास मोठमोठे हाेर्डिंग लावले गेले अाहेत. यातील बरेचसे फलक अनधिकृत असतानाही त्याकडे पालिकेकडून दुर्लक्षच केले जात असल्याने लाखोंचा महसूल बुडत आहे. प्रशासकीय यंत्रणा सुस्तच असल्याने अतिक्रमण विभागाचा कारभार कर्मचाऱ्यांविषयी संशय व्यक्त हाेत आहे. वाहतूक बेटांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असला, तरी होर्डिंग्जमुळे त्याचे विद्रूपीकरणच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.

होर्डिंगची आकडेवारीच नाही...
उच्चन्यायालयाने अवैध होर्डिंगवरून महापालिकेचे कान टोचले आहेत. त्याच अनुषंगाने नाशिक महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगबाबत पाहणी केली असता अशी धक्कादायक बाब समोर आली. महापालिकेच्या विविध कर विभागात विचारणा केली असता शहरात अनधिकृत होर्डिंगच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. वैध होर्डिंग किती याबाबतही महापालिकेकडे ठोस आकडेवारी नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.

न्यायालयाचा आदेश पायदळी
होर्डिंग्जमुळे मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असून, काही ठिकाणी अपघातांनाही हे अनधिकृत होर्डिंग्ज कारणीभूत ठरत आहेत. असे असतानाही होर्डिंगबहाद्दरांवर कारवाई करण्याकडे महापालिका पोलिस यंत्रणा डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेने प्रमुख चौकांत लाखो रुपये खर्च करून दिशादर्शक कमानी उभारल्या आहेत. त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगीशिवाय फलक लावण्यास मनाई केली आहे. तरीही अनेक चौकांत त्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. तरीदेखील कारवाई करण्यात पालिका प्रशासन असमर्थ असल्याचे दिसून येते.

मंदिर, वाहतूक बेटावरही हाेर्डिंग
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीस आलेल्या नेत्यांच्या स्वागतासाठी शहरातील लोकप्रतिनिधींपाठोपाठ भाजपच्या गल्लीबोळातील किरकोळ कार्यकर्त्यांनीही स्वत:ची छबी झळकावत मोठमोठे स्वागताचे होर्डिंग्ज लावले. वाहतूक बेट, चौक, मंदिरे, विजेचे खांब, पथदीपांसह मिळेल त्या जागी नियमबाह्य होर्डिंग्ज लावून शहराचे विद्रूपीकरण करण्यात भाजपतच जणू स्पर्धा लागली असल्याचे चित्र शहरभरात दिसत आहे.

अाता सत्ताधाऱ्यांवर कारवाई होणार का?
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगीशिवाय फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी शहरात भाजपची बैठक जाहीर सभा असल्यामुळे शहरभर हाेर्डिंग लावण्यात अाले. खासकरून सभास्थळ असलेल्या पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज उभारण्यात आलेले आहे. महापालिका निवडणूक ताेंडावर असल्यामुळे प्रत्येकाला अापला चेहरा लक्षात राहावा, यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसून अाले. यात काही होर्डिंग्ज अनधिकृत असून, प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्षच केले आहे. सत्ताधारी भाजपकडूनच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात असून, आता या होर्डिंग्जवर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनधिकृत हाेर्डिंग्जवर कारवाई करणार...
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला मात्रदिसेनासे झालेत हाेर्डिंग्ज; कारवाईकडे काणाडाेळाच...
शहर विद्रूप करणाऱ्या अनधिकृत हाेर्डिंगविराेधात महापालिकेला फाैजदारी कारवाई करण्याचे अादेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही प्रशासन ढिम्मच असून, शनिवारी तर राज्यातील सत्ताधारी भाजपचीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून तर अर्ध्या मंत्रिमंडळाच्या स्वागताचे फलक गल्लीबाेळात अवतीर्ण झाले. यावेळी महापालिकेने गांधारीप्रमाणे डाेळ्याला पट्टी बांधून जणू अापल्याला काहीच दिसत नाही, असा पवित्रा घेतला. सत्ताधाऱ्यांची भलामण करण्याच्या नादात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अवमूल्यन हाेत असल्याकडे दुर्लक्षच करण्यात अाले. शहर विद्रूप करणाऱ्या अनधिकृत हाेर्डिंगबाजीवर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
उच्च न्यायालयाच्या आदेशाला पायदळी तुडवत वाट्टेल तेथे लावले जाताहेत स्वागत फलक; शहराच्या विद्रूपीकरणात पडतेय भर
थेट प्रश्न
{ शहरात अनधिकृत होर्डिंग्जविरोधात कारवाई केली जात आहे, का?
-होय. शहरात अनधिकृत होर्डिंग्जविरोधात कारवाई सुरू आहे.

{शहरात होणाऱ्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त पंचवटी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग लावलेले आहेत, त्याचे काय?
-भाजपकडून होर्डिंग लावण्यासाठी काही अर्ज विभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात अाले होते. त्याची माहिती घ्यावी लागेल.

{होर्डिंग्ज अनधिकृत असेल तर कारवाई करणार का?
-पंचवटी परिसरात लावण्यात आलेले होर्डिंग्ज अनधिकृत असतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.