आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर रस्ते व्यापले अनधिकृत पार्किंगने; वाहतुकीला खाेळंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर सर्रासपणे अवजड वाहने पार्किंग केली जात आहे. या प्रकारामुळे या रस्त्यांना मोफत पार्किंगचे ठिकाण असे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलिसांकडून याविरोधात कारवाई केलीजात नसल्याचे वाहतूक विभागाच्या कामगारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केेले जात आहे. 
 
महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी उड्डाणपूल साकारण्यात आला. मात्र, यानंतरही महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमच आहे. रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे छोट्या-मोठ्या अपघातांच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे. अशी परिस्थिती असताना के. के. वाघ महाविद्यालय ते पाथर्डी फाटा या महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे या वाहतूक काेंडीमध्ये अधिकच भर पडत अाहे. कारवाईची भीती बाळगता अवजड वाहनधारकांकडून या ठिकाणी वाहने उभी केली जातात. यामुळे या ठिकाणांहून वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करतच जावे लागते. अनेकदा यातून वादावादी होऊन थेट हाणामारीचे प्रसंग घडले आहे. परिसरातील नागरिकांना होणाऱ्या अडचणींबाबत अनेकदा वाहतूक विभागाकडे तक्रार केल्यानंतरही याविरोधात कारवाई केली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात अाहे. 

तातडीने कारवाई करावी 
^समांतर रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केले जात असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याविरोधात तातडीने कारवाई केली पाहिजे. सामान्य नागरिकाने याविराेधात अावाज उठविल्यास परिसरातीदुकानदार अरेरावी करत असल्याने नागरिकांची गळचेपी हाेती. विवेकसाळुंखे, नागरिक 
 
गॅरेजचालकांवरही कारवाई करण्याची मागणी 
समांतर रस्त्यावरच काही गॅरेजचालकांनी आपले बस्तान मांडले आहे. या ठिकाणी दुरुस्तीचे काम केले जात असल्याने रस्ता नक्की कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहेे. समांतर रस्ते मोकळे करण्यासाठी पोलिस महानगरपालिका प्रशासनाने गॅरेजचालकांच्या विरोधातही कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...