आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगीकरणातून महापालिका शाेधणार शहरातील ‘पाणीचाेर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात अनधिकृत नळजाेडणी घेणाऱ्यांच्या मुसक्या अावळल्या जाणार असून, पाणी देयकाचे वितरण अनधिकृत जाेडणीची पाेलखाेल करण्याचे काम खासगी संस्थेकडे साेपवण्यात अाले अाहे. पाणीपट्टी खासगीकरणाबाबतच्या ठरावाला महापाैरांनी हिरवा कंदील दाखवला असून, पाच महिन्यांनंतर प्राप्त ठरावाची अंमलबजावणी महापालिका कधी करते, याकडे अाता लक्ष लागले अाहे.
महापालिका क्षेत्रात दाेन लाख हजार ९२७ नळजोडणी ग्राहक असून, तीन महिन्यांनी पाणीपट्टीचे देयक भरणे बंधनकारक अाहे. सद्यस्थितीत रीडिंगपासून तर देयक वितरणापर्यंतची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांकडे अाहे. याच कर्मचाऱ्यांवर घरपट्टी देयक वाटपाचाही भार अाहे. या दाेन्ही कामांसाठी १३७ कर्मचारी असून, पाणी जाेडण्यांची संख्येशी तुलना केली तर प्रति कर्मचारी १४८९ नळजाेडण्या येतात. देयक वाटपच नव्हे, तर घरपट्टी पाणीपट्टीत ग्राहकाचे नाव बदल, कर्जबोजा नोंद, मालमत्ता कराची आकारणी तक्रारी, सूचनापत्राचे वाटप, नवीन नळकनेक्शनच्या नोंदी घेणे मुख्य म्हणजे थकबाकी वसुली, जप्तीसारखी अन्य महत्त्वाची कामे करावी लागत अाहेत. याव्यतिरिक्त शासनाच्या मतदार नाेंदणी, जनगणनेसारख्या कामांचाही बाेजा अाहे. हे सारे करताना करवसुली प्रभावी हाेत नाही. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांवरील खर्चही वायफळ जात असल्याचा निष्कर्ष तत्कालीन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी काढला हाेता. त्यानुसार खासगीकरणाद्वारे ही सेवा सुरू ठेवावी, असा प्रस्ताव महासभेवर मंजूर झाला.

राज्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेत असाच पॅटर्न असल्यामुळे नाशिकमध्येही ताेच पर्याय अवलंबावा, असे मत हाेते. दरम्यान, हा ठराव अाता प्रशासनाला प्राप्त झाला अाहे. त्यानुसार देयक वाटपाबरोबरच अनधिकृत नळजाेडणी ठेकेदार शाेधून काढेल त्यावर कारवाईही करेल.

अत्याधुनिक मीटर लावणार
सद्यस्थितीत पाणी वापर माेजण्याचे मीटर कालबाह्य झाले अाहे. अत्यंत जुन्या मीटरचे अनेक ठिकाणी काटेही दिसत नाहीत. परिणामी, ठराविक रीडिंग देत सरासरी देयक अदा हाेते. हे राेखून पिंपरी-चिंचवडप्रमाणे अत्याधुनिक मीटर बसवले जातील त्यात मीटर बसविणाऱ्या ग्राहकांसाठी पालिकेतर्फे हेल्पलाइनही उपलब्ध केली जाणार आहे.

मिळकतींतील पाण्याचा हिशेब
महापालिकेच्या शाळा, कार्यालये, उद्याने अशा विविध ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा हिशेब घेतला जाणार अाहे. त्यासाठी प्रथम जेथे नळजाेडणी नाही, तेथे मीटर लावले जाईल. नादुरुस्त मीटर बदली केले जातील. विशेष म्हणजे, यापुढील काळात मीटर बंद असल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...