आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'८४ अनधिकृत धार्मिक स्थळे पालिका हटवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या वर्षभरापासून नानाविध कारणास्तव भिजत पडलेला अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील अशी ८४ स्थळे हटवण्यासाठी थेट अंतिम नाेटीस चिकटवण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे ‘नाेटीस मिळाली’, असा दावा करून विश्वस्त वा भक्तांकडून हरकत घेण्याचा मार्ग बंद हाेणार अाहे.
सर्वाेच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणीत राज्यातील सर्वच शहर जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून ती हटवण्याबाबत निर्णय झाला हाेता. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात, तर महापालिका अायुक्तांना शहरी क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्याचे अादेश दिले हाेते. त्यानुसार महापालिका क्षेत्रात २००९ नंतरच्या त्यापूर्वीच्या अशा स्थळांचा शाेध घेण्यात अाला. त्यात २००९ नंतर झालेली स्थळे हटवण्याचे अादेश असल्यामुळे महापालिकेने तयारी सुरू केली; मात्र त्यातही अनेक हरकती अाक्षेप असल्यामुळे अाॅक्टाेबरपर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची मुदत संपून गेली. अाता डिसेंबरपूर्वी ही स्थळे काढण्याच्या दिशेने महापालिकेने गांभीर्याने पावले उचलली अाहेत. २००९ नंतरची तीनशेपेक्षा अधिक अशी स्थळे असून पहिल्या टप्प्यात रस्त्याच्या कडेला असलेली ८४ धार्मिक स्थळे काढली जाणार अाहेत. यातील काही शहरातील राजकीय पक्षांशी संबधित ख्यातनाम व्यक्तींची असल्यामुळे त्यांच्याकडून हरकतीसाठी तयारी सुरू झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...