आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅलेजराेडवरील रोलेट जुगार अड्ड्यावर छापा, २७ तरुणांसह सहा अल्पवयीन ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात अवैधधंद्यावर छापेमारी सुरूच असून, कॉलेजरोडवर एका मॉलशेजारी सुरू असलेल्या अवैध रोलेट आणि चक्री जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा टाकून हा अड्डा उद्ध्वस्त केला. मुख्य संशयित आरोपी पाटील आणि देशमुख यांच्यासह जुगार खेळणाऱ्या २७ तरुणांसह अल्पवयीनांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या पथकाने मंगळवारी (दि. १२) दुपारी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोडवरील एका खाद्य मॉलशेजारी रोलेट आणि चक्री हा ऑनलाइन जुगार अड्डा सुरू असल्याच्या तक्रारी उपआयुक्त पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्या अाधारे छापा घातला असता, १५ ते २० तरुण ऑनलाइन रोलेट जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. संशयितांकडून ३५ हजार रुपयांची रक्कम, संगणक सर्व्हर असा सुमारे लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या पथकाने खाऊ गल्ली येथे चक्री जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात हजार रुपयांची रक्कम, दोन चक्री, दोन टेबल असा एकूण १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रोलेट जुगार अड्डा चालवणारे संशयित मंगेश पाटील, परेश पाटील आणि चक्री जुगार चालवणारा राजू देशमुख या मुख्य संशयितांसह २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीनांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली. पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, उपनिरीक्षक हनुमंत वारे, भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलिसांत गुन्हा नाेंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, गंगापूर पोलिस ठाण्याच्या सुभेदाराकडून या धंद्यांना अभय मिळत असल्याची चर्चा पोलिसांत आहे. पंचवटी परिसरातील युवासेनेचा पदाधिकारी रूपेश पालकर यावर रोलेट जुगार आणि एका युवकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकरोड, पंचवटी शहरात रोलेट ऑनलाइन जुगार सुरूच असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले. गंगापूररोड, कॉलेजरोड परिसरात रोलेट जुगार अड्डे सुरू असल्याने महाविद्यालयीन तरुण याकडे आकर्षित होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...