आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकखाली सापडून काका-पुतण्या ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक / सिडको - वडाळानाकाचौफुलीवर शुक्रवारी (दि. १२) दुपारी वाजेच्या सुमारास झालेल्या दुचाकी ट्रकच्या अपघातात ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडलेल्या दुचाकीवरील काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात अाली अाहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा या चाैफुलीवरील बंद सिग्नल यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
द्वारकाकडून येणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने(एमएच १५, सीके ४६५२) बजाज एम ८० (एमएच १५, एन ७३७१) या दुचाकीस पाठीमागून जाेरदार धडकदिल्याने दुचाकीवरील शशिकांत नामदेव सोनार (वय ३५, रा. साईबाबानगर, िसडको) निखिल मुकेश सोनार (१६) या काका-पुतण्याचा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालक अकिल शेख उस्मान (रा. गंजमाळ, नाशिक) याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.
वडाळानाका चाैफुली परिसरातून रोज मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ सुरू असते. परंतु, या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा फक्त शोभेचीच वस्तू ठरली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चौफुलीवरील सिग्नल यंत्रणा बंदच असल्यानेे येथून पादचाऱ्यांसह वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. वारंवार मागणी करूनही या ठिकाणची सिग्नल यंत्रणा सुरू करणे तर दूरच, मात्र पोलिसांची नेमणूक करण्याचे कष्ट वाहतूक पोलिस विभागाने घेतलेले नाही. यामुळे घडून निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे.
संवेदनशील नागरिक
अपघातझाल्यानंतर ते भीषण दृश्य मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी बघ्यांची चढाओढ सुरू असते. मात्र, या ठिकाणी जमलेल्या युवकांनी मोबाइलमध्ये फोटो काढता, इतरांनाही फोटो काढण्यास मज्जाव केला.
निखिल हा सिडकोतील हिरे विद्यालयात अाठवीत शिकत होता. शिक्षकांचा संप असल्याने शाळेला शुक्रवारी सुटी होती. शशिकांत सोनार हे कंपनी कामगार होते. दाढ दुखत असल्याने ते पंचवटीतील दंत महाविद्यालयात तपासणीसाठी निघाले असता, निखिलही काकांसाेबत िनघाला हाेता. निखिलच्या पश्चात एक भाऊ एक बहीण, आई, वडील, तर शशिकांत सोनार यांच्या पश्चात अाई, वडील, दोन भाऊ, पत्नी असा परिवार आहे.
धाेकेदायक चाैफुली
वडाळानाकाचौफुली धोकेदायक ठरत आहे. उड्डाणपुलाच्या खाली भरधाव वेगात वाहनांची ये-जा सुरू असते. सिग्नल बंद असल्याने अपघातांचे धोके वाढले आहेत. चौफुलीच्याविरुद्ध दिशेने वाहनांची रहदारी सुरू असते. चौफुलीवर वाहतूक पोलिस नसल्याने अपघातांत वाढ झाली आहे. पादचारी मार्गावर अवजड वाहने थांबवली जातात. विरुद्ध दिशेने येणारे वाहन दुचाकी चालकांना दिसत नसल्याने गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.