आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under Age Student Arrested In Builder Bomb Case In Nashik

नाशिक बॉम्ब कोडे उलगडले : बारावीच्या विद्यार्थ्याने ठेवला बिल्डरच्या कार्यालयात बॉम्ब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात बॉम्ब ठेवून धमकी देणाऱ्या अन् बारावीत शिकणाऱ्या एका मुलास पोलिसांनी अटक केली आहे. इंटरनेटच्या अधिक वापरातून काहीतरी ‘धुमशान’ करण्याच्या मोहापायी एका सधन कुटुंबातील मुलाचे आयुष्य घडण्यापूर्वीच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहे. व्यावसायिक वादातून हा प्रकार घडला नसून खंडणीसाठी त्याने हे अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे.
राजीव गांधी भवनसमोरील सुयोजित हाइट्स येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनंत राजेगावकर यांच्या कार्यालयात बुधवारी (दि. २५) कुरियरद्वारे खोके आले होते. ‘एक तासाने काय परिणाम होईल ते पाहा,’ हे पाहण्याची धमकी कार्यालयात फोनद्वारे देण्यात आली होती.
बॉम्बशोधक व नाशक पथकाने (बीडीएस) शिताफीने पोलिसांच्या मदतीने बॉम्ब निकामी केला होता. घडलेल्या प्रकाराचा पोलिसांनी गंभीरपणे तपास करून शहरातून एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली. तो जळगाव येथील उद्योजकाचा मुलगा आहे. मात्र, अधिक पैसे कमावण्याच्या मोहापायी तो या प्रकारात अडकला, अशी माहिती पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंटरनेटच्या मदतीने बनवला बॉम्ब

इंटरनेटचा अतिवापर आणि काहीतरी ‘धुमशान’ करण्याच्या विचारातून खंडणीसाठी बॉम्ब ठेवल्याची कबुली संशयित युवकाने दिली. इंटरनेटवरील माहितीच्या आधारेच आपण अंबड येथे बॉम्ब बनवल्याचेही त्याने सांगितले. मात्र, त्यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्यामुळे खरा प्रकार वेगळाच असल्याची पुष्टी मिळाली. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी घडलेला प्रकार व्यावसायिक अथवा आर्थिक वादातून घडल्याचे सांगितले होते. हे विशेष.
कॉलर आयडीचा फायदा

संशयिताने बॉम्बचे खोके ठेवून फोन केला. कॉल आयडीवर आलेल्या मोबाइल नंबरमुळे तो पोलिसांच्या अलगत जाळ्यात अडकला. फोन केला नसता तर कुरियरचे खोके बाजूला पडले असते. याकडे लक्ष वेधण्यासाठी फोन केला आणि तो अलगद फसला.

बॉम्बसदृश वस्तू

डिस्पोज केलेला बॉम्ब हा खरा बॉम्ब नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला. बॉम्बसदृश वस्तू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. युवकाने इंटरनेटच्या माध्यमातून पेट्रोल बॉम्ब बनवल्याचे पोलिसांनी सांगितले.
धुमशान करण्याचा मोह अंगलट

सुखावस्तू घरातील असूनही काहीतरी वेगळे करण्याच्या विचारातून बॉम्ब ठेवत धमकी देत खंडणी मागण्याचा विचार संशयिताचा होता. - हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे, नाशिक