आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under Combing Operation 57 Criminal Arrested In Nashik CIty

नाशिक शहरात कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत 57 गुन्हेगार गजाआड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 57 गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 36 रिक्षांसह नऊ वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली 11 पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या तीन युनिटने कारवाई केली. झोपडपट्टी परिसर तसेच सराईत गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या भागात मध्यरात्री तपासणी केली. 155 गुन्हेगारांना तपासले. 363 वाहनांची तपासणी केली. तिघांवर कारवाई करून 1300 रुपयांचा दंड वसूल केला.

वाहनांची तपासणी : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणारे तसेच कागदपत्रे नसलेल्यांवर कारवाई करण्यासाठी 413 वाहनांची तपासणी झाली. 75 वाहनचालकांवर कारवाई करून 7500 रुपयांचा दंड वसूल केला.