आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Underpasses Closed, Localities Trouble In Nashik

बंद अंडरपास, स्थानिकांना त्रास ,इंधन खर्चासह त्रासात भर, एकतर्फी निर्णयाने स्थानिकांमध्ये संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महामार्ग परिसरातील स्थानिक रहिवाशांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला इंदिरानगर येथील बोगदा बंद केल्याने पहिल्याच दिवशी स्थानिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी सुमारे चार किलोमीटर अंतर कापून जावे-यावे लागत असल्याने चाकरमान्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, दिवसभरात वाहतूक पोलिस लोकप्रतिनिधींकडे शेकडो वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. आमदार देवयानी फरांदे यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका-यांसह तातडीची बैठक घेत इंदिरानगरकडून येणा-यांसाठी बोगद्याचे एकेरी मार्ग करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. ‘दिव्य मराठी’च्या चमूने या अंडरपासच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी या ठिकाणी वाहनचालकांशी याबाबत चर्चा केली.

महामार्गावरील हा अंडरपास बंद करण्याचा निर्णय वाहतूक कोंडीच्या दृष्टीने जरी महत्त्वपूर्ण असला, तरी स्थानिकांसाठी पहिल्याच दिवशी डोकेदुखीचा ठरला आहे. बंद बोगद्याकडून दुचाकीने दोन्ही बाजूने ये-जा केली असता हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी सुमारे चार किलोमीटर अंतर पार करावे लागत असल्याचे निदर्शनास आले. गोविंदनगर, तिडके कॉलनी आणि सिडको भागातून येणा-या जाणा-यांसह इंदिरानगर, राणेनगर आणि तिडके कॉलनीकडे जाण्यासाठी प्रकाश पेट्रोलपंप येथून रस्ता वळवण्यात आला. या रस्त्यावर सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला. मात्र, दिवसभरात हजारो लहान-मोठ्या वाहनांची ये-जा असलेल्या या मार्गावरील स्थानिकांचा वाहनधारकांचा विचार करता निर्णय झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व्हेनुसार हा बोगदा बंद करण्याचा निर्णय घेतला खरा, इंदिरानगर येथील बोगदा वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद केल्यानंतर याबाबत पोलिसांबरोबर चर्चा करताना वाहनधारक.

‘बोगदा बंदप्रश्नी अभ्यासपूर्वक निर्णयाचा अभाव’
मुंबईनाक्याकडून येणा-या वाहनधारकांना तिडके कॉलनी, जुने सिडको, त्र्यंबकरोडकडे जाण्यासाठी लेखानगर अंडरपास मार्गाने येऊन पुढे जावे लागते, तर इंदिरानगर भागातून सिडकोमध्ये अथवा शहरात अन्य ठिकाणी जाण्यासाठी वळसा घालत येऊन पुन्हा समांतर रोडने इतरत्र जावे लागत आहे.


वाहने सायंकाळी ते वाजून मिनिटात सिडकोकडून नाशिककडे वाहनांची रहदारी मुंबई नाक्याकडून सायंकाळी ६.३५ ते ६.४० या वेळेत झाली. चारचाकी वाहनांची याच वेळात येथून रहदारी झाली

विचारांती निर्णय
रस्ते प्राधिकरण विभागाच्या दिल्ली येथील अभियंत्यांनी सर्व्हे केला. त्यानंतर विचारांती निर्णय झाला. लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घेतले. तात्पुरत्या स्वरूपाचा निर्णय असला तरी यावर तोडगा काढण्यात येणार आहे. प्रशांतवायगुंडे, सहायक आयुक्त, वाहतूक शाखा

एकेरी मार्ग सुरू
इंदिरानगर कडून येणा-यांसाठी बोगदा खुला केला आहे. मात्र, गोविंदनगरकडून जाणा-यांसाठी तोच मार्ग आहे. लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार आहे. देवयानीफरांदे, आमदार

पोलिसांची दमछाक
इंदिरानगरयेथील महामार्गावरील बोगदा बंद केल्याने वाहनधारकांना समजावताना या ठिकाणी ड्यूटीवर असलेले पाेलिस कर्मचारी मोरे आणि लहाने यांची चांगलीच दमछाक झाली. त्यांच्या सांगण्याला जुमानता एकेरी मार्गात वाहने घालणा-या वाहनधारकांची संख्या अधिक दिसून आली.

स्थानिकांकडून सर्वाधिक वापर
दीपालीनगर,कमोदनगर, पेठेनगर, साईनाथनगर, चार्वाक चौक, रथचक्र सोसायटी वडाळा परिसरातून उपनगरमार्गे नाशिकरोडकडे जाणा-यांना सर्वाधिक त्रास झाला. यातील बहुतांशी नागरिकांच्या रोज सिडको आणि शहरात चार ते पाच चकरा होतात.