आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतभरातील कुंभमेळ्यांना युनेस्काेची ‘वैश्विक’ मान्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिककरांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळेच भारतभर हाेणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला अधिकृतरीत्या ‘वैश्विक’ मान्यता मिळाली आहे.  यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे अहवाल सादर केला होता. 


जगभरातल्या अकरा देशांतील विविध पारंपरिक वाद्ये, पारंपरिक खेळ, हस्तकला आदींचा युनेस्काेच्या यादीत समावेश आहे. तीन वर्षांनी एकदा अशा पद्धतीने बारा वर्षांत अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळे भरत असतात. भारतातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यास हजेरी लावत असतात. या उत्सवाची दखल ‘युनेस्को’ ने घेतली आहे.  भारताचा कुंभमेळा हा पृथ्वीतलावरचा एक सर्वात मोठा धार्मिक सोहळा असून नाशिकमध्ये २०१५ ला ताे पार पडला. 


केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे यासंदर्भात खा. हेमंत गाेडसे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात अाला. शर्मा यांनी त्यांच्या अखत्यारीत एक समिती नेमून यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे अादेश िदले. केंद्रीय समितीपुढे सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील अावश्यक असणारे ग्रंथ, साहित्य, छायाचित्रे व व्हिडिअाे क्लिप्स, पुरावा म्हणून दाखल करण्यात अाल्या. याच पुराव्यांच्या अाधारे पॅरिस येथील युनेस्काेच्या कार्यालयात केंद्र सरकारने प्रस्ताव दाखल केला. यातूनच १८८ देशांच्या स्पर्धेत सिंहस्थ कुंभमेळ्याला अांतरराष्ट्रीय दर्जा बहाल झाला अाहे.  


परदेशी पर्यटक वाढतील
युनेस्काेच्या यादीत समावेश झाल्याने यापुढे जागतिक स्तरावर नावलाैकिक मिळेल. कुंभमेळ्यासाठी अावश्यक उपाययाेजना अाणि संवर्धन युनेस्काे पुरवेल. याशिवाय सिंहस्थाचे महात्म्य जगभर पसरून युनाेस्काेच्या यादीच्या अाधारे सिंहस्थाचा अभ्यास करू इच्छिणारे पर्यटक कुंभनगरीला भेट देतील. त्यातून कुंभमेळ्याच्या काळात परदेशी पर्यटकांची संख्या वाढणे शक्य अाहे.

बातम्या आणखी आहेत...