आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दशक, तीनशे सेवक... समर्पणाचा गाैरव साेेहळा; नाशिकच्या ‘प्रबाेधिनी’ संस्थेत अविस्मरणीय कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरासह संपूर्ण देशामध्ये विशेष विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काम करणारी प्रबाेधिनी संस्था चार दशकांचा प्रवास करून तीनशे सेवकांचे ‘समर्पण’ करत असल्यानिमित्त आयोजित सत्कार तब्बल ४० वर्षे भार पेलणाऱ्या खांद्यांचा सन्मान आणि आत्मियतेचा सोहळा ठरला. 
प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक आणि संस्थेतील आजी-माजी सदस्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. ‘प्रबोधिनी’ने जानेवारी २०१७ मध्ये ४१ व्या वर्षात पदार्पण केले. तर प्रबोधिनी कार्यशाळा म्हणजे विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचे डी. एड. कॉलेज असलेल्या संस्थेला २० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने रविवारी (दि. ७) संस्थेतर्फे ‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड) येथे सन्मान सोहळा आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
 
सकाळच्या सत्रामध्ये डॉ. शिरीष सुळे आणि डॉ. ऋचा सुळे यांचे ‘मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर शिक्षक आणि उपस्थितांसाठी व्याख्यान झाले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपली मानसिकता कशी राखायची याबद्दल मार्गदर्शन केले. यानंतरच्या सत्रामध्ये डॉ. सुनील गोडबोले आणि डॉ. अश्विनी गोडबोले यांचे ‘लवकर निदान, त्वरित उपचार’ या विषयावर संवाद साधला. उपस्थितांना त्यांनी लवकर निदानाचे महत्त्व पटवून दिले. निदान झाले असले तरी त्याचा स्वीकार होऊन उपचार होणे हे विशेष विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले. यानंतर कार्यक्रमामध्ये देशभरात प्रबोधिनी प्रशिक्षण संस्थेतून विशेष विद्यार्थी आणि त्यांच्या परिवाराची सेवा करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच, माजी विश्वस्त वासंती सोर आणि अन्य सदस्यांचाही सत्कार करण्यात अाला. यावेळी उपस्थितांनी आपल्या मुलांबरोबर घालवलेल्या क्षणांना उजाळा देत, स्वतःची संस्था सुरू करणे, एखाद्या संस्थेचे प्रतिनिधित्व करणे यासारख्या सगळ्या अनुभवांचे कथन केले. कार्यक्रमासाठी जातपडताळणी उपायुक्त राजेंद्र कलाल, रजनीताई लिमये, प्रा. डॉ. दिलीप भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  सूत्रसंचालन रोहिणी अचवल यांनी केले. 
 
जगन्नाथ वाणी यांना श्रद्धांजली..
प्रबोधिनी संस्थेच्या सुनंदा केले विद्यालयाची इमारत जगन्नाथ वाणी यांच्या देणगीतून उभी करण्यात आली होती. त्यांची सातत्याने मदत या संस्थेला होत होती. म्हणून रजनीताई लिमये यांच्यासह उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
 
अनुभवांचे निबंध आणि भावना..
प्रबोधिनी संस्थेबद्दलच्या अनुभवांचे कथन निबंधाच्या माध्यमातून करून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या निमित्ताने शिक्षकांच्या मनातील भावना व्यक्त होऊन त्यांना माध्यम प्राप्त होईल या हेतूने ही स्पर्धा घेतली गेली. यामध्ये प्रथम क्रमांक प्रल्हाद हंकोर आणि द्वितीय क्रमांक माधवी भोर यांना देण्यात आला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...