आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंडित वीजपुरवठा ठेवण्याचा ‘महावितरण’ला पडला विसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड- अाषाढी एकादशीपर्यंत राज्यातील काेणत्याच गटात विजेचे भारनियमन केले जाणार नसल्याच्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घाेषणेचा महावितरणला विसर पडल्याचे चित्र आहे. गेल्या चार दिवसांपासून नाशिकसह राज्यात हाेत असलेल्या अघाेषित भारनियमनामुळे ग्राहक हैराण झाले अाहेत. दाेन ते अडीच तासांचे अघाेषित भारनियमन हाेत असल्याने ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात अाहे.
नाशिक शहर विभागात अ, ब, असे चार ग्रुप अाहेत. विजेची तूट निर्माण झाल्यास भारनियमनाचा पहिला फटका ग्रुपला बसताे, त्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यास क, गटात भारनियमन केले जाते. विजेची तूट निर्माण झाल्यानंतर महावितरणने सर्वच गटांत काही तासांचे भारनियमन केले. दाेन दिवसांनंतर परिस्थिती बदलल्यानंतर गेल्या दाेन दिवसांपासून गटात भारनियमन केले जात अाहे.

वातावरणातील बदलामुळे तीन ते साडेतीन हजार मेगावॅटने विजेच्या मागणीत वाढ झाल्याने तात्पुरते भारनियमन केले जात असल्याचा दावा महावितरणने केला अाहे. राज्याची विजेची मागणी १३,५०० ते १४,००० मेगावॅटवरून साडेतीन हजार मेगावॅट वाढल्याने तूट भरून काढण्यासाठी काही तासांच्या अघाेषित भारनियमनाशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुरेशी वीज उपलब्ध
नाशिकशहरासाठी अपेक्षित वीज उपलब्ध झाली असून, काेणत्याच गटात यापुढे भारनियमन करण्याची अावश्यकता भासणार नाही. गेले चार दिवस मागणी वाढल्याने माेठी तूट निर्माण झाल्याने तात्पुरते भारनियमन करावे लागले. अार.डी. चव्हाण, अधीक्षक अभियंता
बातम्या आणखी आहेत...