आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग विद्यापीठासाठी "क्रेडाई'चे साकडे, केंद्रीय आरोग्‍यमंत्री श्रीपाद नाईक यांना दिले निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकमध्ये योग विद्यापीठ उभारण्याची मागणी ‘क्रेडाई’ने केली. नाशिक दौ-यावर आलेले केंद्रीय आरोग्‍यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेत ‘क्रेडाई’च्या शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन सादर केले.
पंतप्रधानांनी भारताला जगाचा योगगुरू बनविण्याचा निर्धार व्यक्त केला असून, त्याला प्रतिसादही लाभत अाहे. जगभरात या वर्षापासून याेग दिवस साजरा करण्याचेही जाहीर करण्यात अाले अाहे. या पार्श्वभूमीवर प्राचीन मंत्रभूमी असलेल्या नाशिकचे पर्यावरण याेग विद्यापीठासाठी पूरक असल्याने येथे ‘याेगा युनिव्हर्सिटी’ची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे, सुनील गवांदे यांनी निवेदनाद्वारे केली. या वेळी अामदार प्रा. देवयानी फरांदे, प्रा. सुहास फरांदे अादी उपस्थित हाेते.