आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Of Pune , Latest News In Divya Marathi

पुणे विद्यापीठ ‘बेव्ही’च्या सोशल साइटवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भारतातल्या सगळ्या विद्यापीठांबरोबर पुणे विद्यापीठही ‘बेव्ही’ या संकेतस्थळाशी जोडले गेले आहे. इतर सोशल नेटवर्किंग साइटप्रमाणे या साइटवरदेखील आपल्या मित्रमैत्रिणींशी संपर्कात राहाता येते. फरक फक्त एवढाच की तुमच्या युनिव्हर्सिटीच्या किंवा तुमच्या बॅचच्या मित्रांशी तुम्ही येथे बोलू शकता.
सिक्कीम विद्यापीठ, मणिपाल विद्यापीठ, मुंबई विद्यापीठासह अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांची या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळावर प्रथम तुमच्या विद्यापीठाचे नाव विचारले जाते. तुम्ही विद्यापीठ निवडल्यानंतर रजिस्ट्रेशनचे पर्याय समोर येतात, यात तुमची प्राथमिक माहिती भरायची असते. सोशल नेटवर्किंग साइटची ओळख असणारी प्रोफाइल या संकेतस्थळावरसुद्धा तुम्हाला तयार करावी लागते. विद्यापीठात होणाया स्पर्धा, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये होणाया परीक्षांविषयीच्या सगळ्या अपडेट या संकेतस्थळावर तुम्हाला मित्रांमार्फत मिळतात. कोणत्याही एका पोस्टवर आपली प्रतिक्रिया नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तुमच्या समस्या, प्रश्न याठिकाणी विचारता येतात.

सोशल नेटवर्किंग साइटचा सगळ्यात जास्त उपयोग जुने मित्र शोधण्यासाठी होतो, या संकेतस्थळाचाही उपयोग आपल्या शाळेतले, महाविद्यालयातले कोणत्याही बॅचचे, विषयाचे जुने मित्र शोधण्यासाठी करता येऊ शकतो. याचबरोबर विद्यापीठामध्ये घडणाया प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडी, येणाया कार्यक्रमांच्या नोंदी विद्यापीठाच्या संकेतस्थळाप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळतील.