आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात समाजकंटकांनी कारच्या काचा फोडल्या; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. वाजे यांच्या घरासमोर पार्क केलेल्या कारच्या काचा अज्ञात व्यक्तींना फोडल्या. - Divya Marathi
डॉ. वाजे यांच्या घरासमोर पार्क केलेल्या कारच्या काचा अज्ञात व्यक्तींना फोडल्या.
नाशिक- सातपूर सदगुरूनगर येथे डॉक्टर अमोल वाजे यांच्या वाहनाची काच अज्ञात समाजकंटकांनी फोडल्याची घटना घडली आहे. डॉ. वाजे यांच्या घरासमोर पार्क केलेल्या स्विफ्ट डिझायर (एमएच 41, एएम 802) कारच्या काचा पहाटे 3 वाजून 20 मिनिटे ते 3 वाजून 22 मिनिटाच्या दरम्यान समाजकंटकांनी फो़डल्या. 
 
दुचाकीवर आले होते 2 जण
दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी पेवर ब्लॉकच्या मदतीने समोरील व मागील काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. याबाबत डॉ. वाजे यांनी सातपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस हवालदार तुपे तपास करीत आहेत. पोलिसांनी या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...