आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समतानगरला रात्री टोळक्याचा हैदोस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- आगर टाकळी परिसरात शुक्रवारी रात्री अज्ञात १० ते १५ जणांच्या टोळक्याने काही वाहने घरांवर दगडफेक करून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. टाकळी भागात दहशतीचे वातावरण पसरलेले असताना पोलिसांत या प्रकरणी कुठलीच नोंद नसून असा प्रकारच घडला नसल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी याच भागात तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. तेथेच वाहनांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या, तर काही घरांवर दगडफेक करण्यात आली. भीतीपोटी नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. समतानगर भागात रात्री वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. टोळक्याने मारुती, अॅसेट दुचाकींचे नुकसान केले. तसेच गरड वस्ती, पटवा मळा, राहुलनगर, पंचशीलनगर, इंद्रायणी कॉलनी, टाकळीनगर परिसरात टोळक्याने लाठ्या-काठ्या घेऊन शिवीगाळ करीत दहशत निर्माण केली. भीतीमुळे नागरिक घराच्या बाहेर आले नाहीत.
पोलिसांना कळविल्यानंतर तासाभरानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन केवळ पंचनाम्याचा सोपस्कार पार पडला. अनेक गाड्यांचे नुकसान, घरांवर दगडफेक झालेली असताना पोलिसांनी फक्त दोघा मित्रांच्या वादात एक गाडी ढकलून दिल्याचा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले की, समतानगर भागात दोघांच्या भांडणात एक गाडी ढकलून दिल्याची घटना घडली आहे. इतर कुठलीच अनुचित घटना घडलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...