आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unkown Men Attack On Divya Marathis Nashik Reporter

‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीवर हल्ला; महिलेसह चार जण अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अवैध धंद्याविराेधात वृत्त प्रसिद्ध केल्याचा राग मनात ठेवून एका महिलेसह ितच्या साथीदारांनी दैनिक ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी संदीप जाधव यांंच्यावर शस्त्राने हल्ला केला. ही घटना रविवारी दुपारी "दिव्य मराठी' कार्यालयाच्या अावारात झाली. जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू अाहेत. दरम्यान, याप्रकरणी पाेलिसांनी महिलेसह चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली अाहे.

अाडगाव परिसरात देह विक्रीसाठी मुलींना पळवण्यात येत असल्याच्या संशयावरून महिलांमध्ये वाद झाला हाेता. पाेलिसांनी संबंधित महिलेवर कारवाई केली हाेती. याबाबतचे वृत्त रविवारी (दि.१४) "दिव्य मराठी'च्या अंकात प्रसिद्ध झाले. त्याचा राग मनात ठेवून एका महिलेने रविवारी दुपारी १२ वाजता "दिव्य मराठी'च्या कार्यालयात प्रवेश केला. प्रवेशद्वारावरच जाधव यांची चाैकशी केली. मात्र, ते उपस्थित नसल्याने कळाल्याने फाेन करून त्यांना बाेलावून घेतले. ताेपर्यंत बाहेरच दबा धरून बसलेल्या गुंडांनी जाधव प्रवेशद्वारावर येताच घेराव घातला व महिलेने त्यांच्याशी वाद घातला.

‘अामच्याविरुद्ध बातमी छापताे काय?’ असा दम देत जाधव यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. शस्त्रानेही वार केेले, त्यामुळे जाधव रक्तबंबाळ झाले. त्यांनी अाक्राेश करताच कार्यालयातील दाेघे कर्मचारी व सुरक्षारक्षक मदतीसाठी धावून अाले. तरीही गुंडांकडून मारहाण सुरूच हाेती. घटनेची माहिती कळवताच पाेलिस दाखल झाले. त्यांना बघून हल्लेखाेर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पाेलिसांनी महिलेसह चाैघांना अटक केली.
पाेलिस-अाराेपींचे लागेबांधे?
अवैध व्यवसायाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या महिलेसह ितच्या साथीदारांनी अाडगाव पाेलिस ठाण्यात विचारणा केली. तेथील उपनिरीक्षक जगदाळे यांनी ही बातमी संदीप जाधव यांनी छापली असून त्यांनाच जाऊन तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगितल्याचे हल्लेखाेर महिला पाेलिसांना वारंवार सांगत हाेती. यावरून पाेलिस व अवैध व्यावसायिकांचे लागेबांधे उघड झाल्याचेही बाेलले जात अाहे.
गृह राज्यमंत्र्यांकडून चाैकशीचे अादेश
या हल्ल्याचा राज्यभरातून निषेध हाेत अाहे. ठिकठिकाणच्या पत्रकारांनी हल्लेखाेरांवर कारवाई करण्याची मागणी केली अाहे. राज्याचे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनीही हा हल्ला निषेधार्ह असल्याचे सांगत घटनेच्या चाैकशीचे अादेश दिले अाहेत. नांदेडमध्ये पत्रकारांशी बाेलताना शिंदे म्हणाले, ‘पत्रकार जाधव यांच्यावरील हल्ला निषेधार्हच अाहे. हा हल्ला कोणी केला, हल्ला करण्याचे काय कारण आहे, याची चौकशी करण्यास सांगितले आहे. चौकशीअंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल,’ असे शिंदे म्हणाले.