आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार बेमोसमी पावसाचा जिल्‍ह्यातील नऊ तालुक्यांना तडाखा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कर्नाटकते गुजरात सीमेपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने रविवारी शहरासह जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. बागलाण, चांदवड, कळवण, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, मालेगाव तालुक्यांत या बेमोसमी पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे ऊस, सोयाबीनची कापणी ठप्प झाली आहे. बागलाण तालुक्यात द्राक्षांना तडे गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची आठवण झाली. देवळा तालुक्यात तीन हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले.

जिल्हा आणि शहरात सलग तीन दिवस या बेमोसमी पावसाने तडाखा िदला आहे. त्यामुळे सोयाबीन, मका यांची सोंगणी रेंगाळली, तर ज्या शेतकऱ्यांनी सोंगणी करून माल शेतात ठेवला होता, तो पूर्णपणे भिजला आहे. निफाड, चांदवड, दिंडोरी तालुक्यांत द्राक्षांच्या बागा मोठ्या प्रमाणात असून, येथील बागांमधील द्राक्षमणी फुगवणीला लागले होते, तर काही वेलींना फुलोरा आहे. मुसळधार पावसामुळे फुगवण होत असलेल्या मण्यांना तडे जात आहेत
माध्यमांनी हानीची माहिती द्यावी
कांद्याचेभाव वाढले की प्रसारमाध्यमे मीडिया प्रथम धाव घेतो. आता द्राक्ष आणि डाळिंबाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आता तरी प्रसारमाध्यमांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रसारण करावे. संदीपनिमसे, द्राक्षउत्पादक
डाळिंब उत्पादकांना विशेष पॅकेज द्यावे
डाळिंबपिकावरील तेल्या रोगाने उत्पादक हैराण झाले आहेत. मुसळधार पावसामुळे फळकुज होत असल्याने शासनाने डाळिंब उत्पादकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. विनोदजाधव, डाळिंब उत्पादक

कृषी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे
नुकसानीचेपंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी लेखी कागदपत्र असल्यास कृषी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात अडचणी येणार नाहीत. हेमंतकाळे, विभागीय कृषी