आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्थिर माध्यमातील साहित्याला स्थिरता अाणा, श्रीकांत उमरीकरांचे अावाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘नवीन पिढी वाचत नाही असा सूर सगळीकडूनच उमटताे. ते काहीअंशी खरेही अाहे, पण जगाच्या सुरुवातीपासून ते २०१० पर्यंत जेवढे शब्द वाचले गेले असतील, लिहिले गेले असतील त्याच्या कितीतरी पटीने अधिक शब्द २०१० नंतर अाजपर्यंत वाचले अाणि लिहिले गेले अाहेत, ते केवळ साेशल मीडियाच्या माध्यमातून. मग अडचण कुठे अाहे... तर अडचण अाहे ती की, या अस्थिर माध्यमातून त्याला स्थिरता अाणणे महत्त्वाचे अाहे,’ असा सल्ला अाैरंगाबादेतील साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांनी देताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली.
नाशिक येथे अभाविपतर्फे १५व्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाला शुक्रवारी लाेककवी वामनदादा कर्डक साहित्यनगरीत अर्थात रावसाहेब थाेरात सभागृहात प्रारंभ झाला. या संमेलनाचे उद‌्घाटन उमरीकर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, तुम्ही साेशल मीडियाचा चांगला वापर करता, पण भाषा बदलत चाललेली अाहे. बऱ्याचदा अालेला मजकूर न वाचताच पुढे फाॅरवर्ड केला जाताे. अालं अाणि ढकलून दिलं असं केलं जातं. विचार न करता असे मेसेज पुढे ढकलल्याने विपरीत गाेष्टी हाेतात. मुख्य म्हणजे त्या विषयाची गंमत अाणि गंभीरता जाते. त्यामुळे असे मेसेज तुम्ही न वाचता पुढे पाठवू नका, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. याबराेबरच त्यांनी कुसुमाग्रज अाणि सावरकरांच्या कवितांचा अाधार घेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, तुम्ही भविष्यातील लेखक, साहित्यिक अाहात म्हणूनच एक
लक्षात ठेवा की,
विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची....

कुसुमाग्रजांच्या या अाेळींतून तुम्ही जर प्रेरणा घेतली तर नक्कीच अापलं साहित्य समृद्ध हाेईल अाणि ते लाेकांपर्यंत पाेहाेचेल. बऱ्याचदा अभाविपचा कार्यक्रम म्हटलं की, ‘चलाे नाशिक’ वगैरे अशा घाेषणा हाेतात पण, हे ‘मिलाे नाशिक’ अाहे. तरुणांची भाषा ही ऊर्जेने, उत्साहाने, उल्हासाने भरलेली असते. पण अशाचवेळी त्याला विधायक वळण येणे गरजेचे असते. येथे मला कुसुमाग्रजांचीच कविता अाठवते की,
अशी हटाची, अशी तटाची
उजाड भाषा हवी कशाला
स्वप्नांचे नव गेंद
फुलती तुझ्या उषाला...

अापली लेखणी, साहित्य हे विधायक कामासाठीच असले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
सावरकरांचा पिंड वेगळा हाेता, पण त्यांच्यात एक निसर्गकवी लपलेला हाेता हे सांगताना
नक्षत्रांही तारांकित हे नभ चमचम भासे
प्रतिबिंबीत मग सागरही हा तारांकित भासे

ही कविता सादर करून एक क्रांतिकारी माणूस काेमल भाषाही लिहू शकताे हे सांगण्याचा प्रयत्न केला. भाषा कशी वापरायची याचे भान साहित्यिकाने ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी पुन्हा पुन्हा मांडले. याशिवाय पुस्तकी साहित्य साेडूनही अापल्याकडे अनेक प्रकारचे साहित्य अाहे. जसे लाेकगीते, अाेव्या याकडेही तरुणांनी लक्ष द्यावे. असे साहित्य शाेधावे त्याचे संशाेधन करण्याची गरजही उमरीकर यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...