आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unstructured Autos Driver Issue At Nashik,, News In Matrathi

75 बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी अंबड, इंदिरानगर व शहरातील प्रमुख चौकांमध्ये सुमारे 75 बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

शहरात बेशिस्त रिक्षाचालकांबाबत नागरिकांनी वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या होत्या. शाखेकडून गुरुवारी 120 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शुक्रवारी अंबड आणि इंदिरानगर परिसरात वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी रिक्षाचालकांवर कारवाई केली. यामध्ये प्रामुख्याने कागदपत्र जवळ न बाळगणे, गणवेश परिधान न करणे, बिल्ला व परमिट न बाळगणे आदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांवर कारवाई करण्यात आली. यासह पंचवटी, शालिमार, रविवार कारंजा, निमाणी, दिंडोरीरोड येथेही नियमित कारवाई करण्यात आली.

येथे झाली कारवाई : अंबड परिसरातील पाथर्डी फाटा, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, तर इंदिरानगर भागात चार्वाक चौक, बापू बंगला, राजीवनगर, गुरू गोविंदसिंग स्कूल, राजसारथी सोसायटी आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली.
अचानक कारवाई सुरूच राहणार
बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच राहणार आहे. शहरात कुठेही अशा प्रकारची अचानक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकात नियमित कारवाई सुरूच असते. पुढेही अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. एम. एन. बागवान, वरिष्ठ निरीक्षक, वाहतूक शाखा