आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरणासह बेमोसमी पावसाने शहरवासीय हैराण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात सोमवारी दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारी वाजेच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. हवामान केंद्रात ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी शहरात कमाल ३१.१, तर किमान १७.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती.

दुपारी उकाडा, ढगाळ वातावरण पाऊस आणि रात्री पुन्हा उकाडा या बदलत्या हवामानामुळे शहरवासिय हैराण झाले आहेत. तीन दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता कमी होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे तपमानात घट झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, रात्रीचे तपमान हे २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याने रात्रीचा उकाडा मात्र आहे. शहरात सलग तीन दिवसांपासून कमाल तपमानात घट आणि किमान तपमानात वाढ झाली आहे. सोमवारी शहरात नाशिकरोड, द्वारका, कॉलेजरोड, राणेनगर, इंदिरानगर, महात्मानगर, सातपूर, आडगाव, गंगापूररोड या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.
शहरात सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे शहराबाहेरील भागात असे कुंद वातावरण दिसत होते.