आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘यूपीएससी’च्या पूर्वपरीक्षेसाठी १९ जूनपर्यंत करता येणार अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- येत्या २३ ऑगस्टला केंद्रीय लाेकसेवा आयाेगा (यूपीएससी)तर्फे विविध पदांसाठी आणि जागांसाठी पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये तब्बल ११२९ जागा भरल्या जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पूर्वपरीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १९ जून असून, उमेदवारांना या तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत आपले अर्ज भरता येणार आहेत.
या पूर्वपरीक्षेत २४ विभागांसाठी परीक्षा होणार आहे. ज्यामध्ये इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलिस सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस यांच्यासह अन्य २१ विभागांचा सहभाग असेल. तसेच, यासाठी पात्रतेच्या अटी आणि इतर माहिती उमेदवाराने केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या संकेतस्थळावर भरावयाची आहे.

एकदा भरलेली माहिती ही अंतिम गृहीत धरली जाणार असून, ही माहिती जर खोटी आढळली तर त्या विद्यार्थ्याचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द केले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...