आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायगाव फाटा येथे आज कृत्रिम पावसाचा प्रयोग, जिल्ह्यात आकाश निरभ्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हितासाठी रवविारी येवल्यातील सायगाव फाटा कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. रवविारी (दि. आॅगस्ट) वातावरणाचा अंदाज घेऊन हा प्रयोग केला जाणार असून, यासाठी १० रॉकेटसह पंधरा सदस्यांचे पथक शनविारी येथे हजर झाले आहे. विशेष म्हणजे, यात शासनाचा कुठलाही सहभाग नसून, इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (आयएसपीएस) हिंद फाउंडेशन रॉकेट फायरिंगद्वारे कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. आशिया खंडात पहिल्यांदा अशा प्रयोगासाठी इंधन म्हणून साखरेचा वापर होणार आहे.
यंदा पावसाने सुरुवात केली, परंतु नंतर थेंबभरही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे हंगाम अडचणीत आला असून, पुन्हा दुष्काळाचे सावट घोंघावू लागल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या आठवड्यात या कंपनीच्या टीमने दुष्काळी भागाची पाहणी करून पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. येवला नांदगाव तालुक्यात कित्येक दविसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पाडताच ढग वाहून जातात. त्यामुळे या भागात ढगांमध्ये पुरेशी आर्द्रता असल्यानेच या प्रयोगासाठी सायगावची नविड केली गेली आहे.

या प्रयोगासाठी भारतातच नव्हे, तर आशिया खंडात पहिल्यांदाच रॉकेट लाँचिंगसाठी इंधन म्हणून साखरेचा उपयोग करण्यात येणार आहे. ढगांवर रॉकेट आदळून मोठा ब्लास्ट होणार असून, त्यानंतर सिल्व्हर आयोडाइडची ढगांवर फवारणी होणार असून, त्यानंतर ४० ते ६० मिनिटांनी या पावसाला सुरुवात होईल. चारही दिशांना २० किलोमीटरपर्यंत हा पाऊस पडू शकत असल्याची माहिती आयएसपीएसच्या वतीने देण्यात आली. प्रयोगासाठीची सर्व सामग्री शनविारी येवल्यात आणण्यात आली. अवकाशात १२ किलोमीटर अंतरावर रॉकेट सोडण्यात येणार आहे.

रॉकेट ढगांवर आदळण्यास काही सेकंद लागतील, परंतु त्यानंतर ५० मिनिटांनंतर पाऊस पडेल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. ही कंपनी स्वखर्चाने खास शेतकरी हितासाठी असे प्रयोग करते.
यापूर्वी सिंधुदुर्ग, सांगलीसह किमान ५० प्रयोग झाले आहेत. यासाठी कंपनीने ग्यान अंजली हे सहा किलोमीटर, ग्यान ज्योती हे १५ किलोमीटर, हायब्रीड रॉकेट हे ४५ किलोमीटर, तर ग्यान अंतरिक्ष हे २०० किलोमीटर वरती जाणारे रॉकेट बनवले असून, यातील ग्यान अंजली हे रॉकेट वापरले जाणार आहे. उद्या ढगांचा अंदाज घेऊन स्थळ नविडणार आहे. मात्र, आज याची जोरदार पूर्वतयारी येथील विश्रामगृहावर सुरू होती.

अमित राव यांच्या नेतृत्वाखाली १५ सदस्य यासाठी कार्यरत आहेत. हा प्रयोग करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, संरक्षण विभाग यांची परवानगी घेण्यात आली आहे. तर, या मार्गावरून मुंबई ते औरंगाबाद विमानसेवा सुरू असते. त्यामुळे ओझर येथून हवाई वाहतूक कंपनीची परवानगीदेखील घेण्यात आली आहे, असे या पथकाकडून सांगण्यात आले. हा प्रयोग करण्यासाठी दहा रॉकेट आणले असले, तरी प्रथम पाच रॉकेटचाच वापर केला जाणार असून, मग परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. एका रॉकेटसाठी किमान चार लाखांचा खर्च असून, तोदेखील ही कंपनीच करते, हे विशेष...!

प्रशासनाचे सहकार्य
शनविारीपाहणी पूर्ण झाल्यानंतर रवविारी सकाळी साडेनऊ वाजता सायगाव फाटा येथे पाऊस पाडण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाने आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे. परिस्थिती पाहून पाऊस पाडला जाईल. -वासंती माळी, प्रांत,येवला

नाशिक जिल्ह्यात आकाश निरभ्र राहणार असून वातावरण कोरडे राहणार आहे. कृत्रिम पावसासाठी दोन दविसांपूर्वी वातावरण योग्य होते. मात्र, आता ढगाळ वातावरण असल्याने शक्यता कमी आहे, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.

ढग पाहून निर्णय
नांदगाव,येवल्यातील ढग पाहून हा निर्णय घेतला जाईल. शनविारी सायंकाळी पाहणी पूर्ण केली. तसेच, रवविारी सकाळी ढग, हवेचा वेग तपासला जाईल, इतर तांत्रिक बाबी तपासल्या जातील. पाणलोट क्षेत्रातील काही भाग तपासला जाईल. त्यानंतर पाऊस पाडला जाईल -अमित राव, संचालक
बातम्या आणखी आहेत...