आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटा चलनात; रॅकेटची शक्यता, बँकांसह पेट्रोलपंपावरही होतोय वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राष्ट्रीयी कृत बँकांच्या शाखांतील भरण्यात आढळणाऱ्या बनावट नोटांवरून शहरात बोगस नोटा चलनात आणल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारीही अशाच एका प्रकारात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुमारे 25 हजारांच्या बोगस नोटांचा भरणा झाला असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विविध बँकांमध्ये दिवसभरात एक तरी बोगस नोटांचा भरणा झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल होत आहे. त्यात शुक्रवारी आणखी एका प्रकरणाची भर पडली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुना आग्रारोड येथील शाखेत अनोळखी व्यक्तीने १००, ५०० १००० रुपयांच्या ५० बोगस नोटांचा भरणा केल्याचा प्रकार सायंकाळी कॅशिअरच्या निदर्शनास आला. अशोक बैरागी यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र बँकेत सर्वच नोटा तपासणी यंत्राद्वारे मोजल्या जातात. पडताळणी केली जाते. असे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगस नोटांचा भरणा झाल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. शहरातील पेट्रोलपंपांवरदेखील बोगस नोटा दिल्या जात असल्याचे पेट्रोलपंप कामगारांनी सांगितले. यापूर्वी गुन्हे शाखेच्या तत्कालीन अधिका-यांनी गोवर्धन परिसरातून परप्रांतीय संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट नोटाही हस्तगत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
बँकांनीही घ्यावी काळजी
बनावट नोटांप्रकरणी गुन्हा दाखल असून, बँकेच्या सीटीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही संशयितांचा शोध घेत आहोत. बँकांनीदेखील नोटा स्वीकारताना काळजी घेण्याची गरज आहे. मधुकरकड, पोलिसनिरीक्षक, भद्रकाली